विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त जागेवर शिवसेनेनं उर्मिला यांना उमेदवारी दिली आहे. ही उमेदवारी देताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वत: त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर उर्मिला यांच्या प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कालच या चर्चेला दुजोरा दिला होता. त्यानुसार आज दुपारी उर्मिला मुख्यमंंत्र्यांच्या ” निवासस्थानी पोहोचल्या. तिथं त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यांनी उर्मिला यांच्या हाती शिवबंधन बांधलं. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उर्मिला यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व मीनाताई ठाकरे यांच्या तसबिरीला नमस्कार केला.
हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या उर्मिला गेली काही वर्ष अभिनयापासून दूर होत्या. अलीकडेच त्या ‘आजोबा’ या मराठी चित्रपटात दिसल्या होत्या. त्या व्यतिरिक्त त्या फारशा मोठ्या पडद्यावर दिसल्या नाहीत.
वाचा:
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी उर्मिला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून त्यांना भाजपचे गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात उमेदवारी मिळाली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात त्यांची भाषणे, मुलाखती यातून त्यांची राजकीय समज व सामाजिक प्रश्नांविषयी असलेल्या त्यांच्या आकलनाची चुणूक दिसली होती.
वाचा:
अभिनेत्री कंगना राणावत हिनं मुंबई, मुंबई पोलीस व बॉलिवूडबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याला उत्तर दिल्यामुळं अलीकडं त्या पुन्हा चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर शिवसेनेनं विधान परिषदेसाठी त्यांच्या नावाची शिफारस केली होती.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times