सांगली: पुणे पदवीधर मतदारसंघातील मतदानाच्या निमित्ताने मंगळवारी कडेगाव (जि. सांगली) येथे कृषी राज्यमंत्री आणि भाजपचे उमेदवार हे एकत्र आले. देशमुख स्वतःहून भेटीसाठी आल्यानंतर मंत्री कदम यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीतील प्रमुख दोन्ही उमेदवार जिल्ह्यातील असल्याने सकाळपासूनच जिल्ह्यात चुरशीने मतदान सुरू आहे. भिलवडी येथील कार्यकर्त्यांच्या गोंधळाचा अपवाद वगळता सर्वत्र शांततेत मतदान सुरू आहे. ( Wishes )

वाचा:

पुणे पदवीधर मतदार संघात भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांच्यात चुरशीची लढत होत आहे. उमेदवारांची संख्या जास्त असल्याने मतविभागणीचा फटका प्रमुख उमेदवारांना बसण्याचा धोका वाढला आहे. यामुळे उमेदवारांकडून विजयी मातांच्या जुळवाजुळवीसाठी आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. मंगळवारी सकाळी मतदानाला सुरुवात होताच भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांनी कडेगाव येथे कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांची भेट घेतली. मतदान केल्यानंतर मंत्री कदम हे मतदान केंद्रापासून जवळच असलेल्या एका कार्यकर्त्याच्या घरी थांबले होते. यानंतर काही वेळातच संग्राम देशमुख मतदान करण्यासाठी पोचले. मंत्री कदम हे जवळच असल्याची माहिती मिळताच ते भेटीसाठी गेले. या भेटीत मंत्री कदम यांनी भाजपच्या उमेदवारास शुभेच्छा दिल्या. या भेटीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले असून, जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

वाचा:

भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड या दोघांनीही मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना विजयाचा विश्वास व्यक्त केला. ‘पुणे पदवीधर मतदारसंघ हा भाजपच्या विचारांचा बालेकिल्ला असल्याने मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळेल,’ असे संग्राम देशमुख यांनी सांगितले. ‘पुणे पदवीधर मतदारसंघ आता कोणाची मक्तेदारी राहिलेला नाही. वाडी-वस्तीवरील मतदार मतदानासाठी मोठ्या उत्साहाने घराबाहेर पडत आहेत, यामुळे या निवडणुकीत नक्की परिवर्तन होईल,’ असा विश्वास अरुण लाड यांनी व्यक्त केला. पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

भिलवडीत पोलिसांकडून लाठीमार

भिलवडी येथील मतदान केंद्रावर भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्यासोबत आलेल्या काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. उमेदवारांसोबत कार्यकर्ते मतदान केंद्रात केल्याने पोलिसांनी कार्यकर्त्यांना हटकले. यावेळी कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी केल्याने पोलिसांनी लाठीमार करून त्यांना पिटाळून लावले. जिल्ह्यात इतरत्र शांततेत मात्र चुरशीने मतदान सुरू आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here