परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते यांनी ट्रुडो यांच्या टिप्पणीवर मीडियानं केलेल्या प्रश्नांना उत्तर दिलं. ‘ आम्ही भारतीय शेतकऱ्यांशी संबंधित कॅनडाच्या नेत्यांची टिप्पणी पाहिली, परंतु ही प्रतिक्रिया चुकीच्या माहितीवर आधारीत आहे. या पद्धतीच्या टिप्पण्या अनावश्यक आणि निरुपयोगी आहेत. विशेषकरून जेव्हा ही बाब एका लोकशाही देशातील अंतर्गत मुद्द्यासंबंधीत असेल. अशा गोष्टी राजकीय हेतूनं चुकीच्या पद्धतीनं समोर आणू नये, हीच योग्य गोष्ट ठरेल’ असं प्रत्यूत्तर श्रीवास्तव यांनी दिलं.
संबंधित बातम्या :
वाचा : वाचा : वाचा :
दुसरीकडे, भाजपचे वजनदार नेते यांनीही आपली नाराजी व्यक्त केली. भारताच्या अंतर्गत मुद्यावर टिप्पणीच्या अधिकारासंबंधी त्यांनी प्रश्न उपस्थित केला. ‘ट्रुडो कोण आहेत? हे भारताच्या सार्वभौम मुद्यांत हस्तक्षेप करण्यासारखं नाही का?’ असं ट्विट राम माधव यांनी केलंय.
दुसरीकडे, शिवसेना प्रवक्त्या यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त केलीय. ट्रुडो यांनी भारताच्या अंतर्गत मुद्यावर आपली राजकीय पोळी भाजपण्याचा प्रयत्न करू नये, असं चतुर्वेदी यांनी म्हटलंय. ‘प्रिय जस्टिन ट्रुडो, तुम्ही व्यक्त केलेल्या काळजीमुळे प्रभावित आहे. परंतु भारताच्या अंतर्गत मुद्दे इतर कोणत्याही दुसऱ्या देशासाठी राजकीय चारा बनू शकत नाहीत. कृपया इतर देशांप्रती शिष्टाचाराच्या आमच्या भावनेचा सन्मान करा’ असं चतुर्वेदी यांनी ट्रुडो यांना टॅग करत म्हटलंय.
तसंच या ट्विटमध्ये शिवसेना प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी पंतप्रधान मोदींनाही टॅग करत शेतकरी आंदोलनावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी केलीय. ‘इतर देश या मुद्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करण्यापूर्वीच यावर तोडगा काढावा, असा आग्रह मी पंतप्रधानांकडे करते’ असंही त्यांनी म्हटलंय.
इतर बातम्या :
वाचा : वाचा :
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times