मुंबई: ‘कोणाला पक्षात प्रवेश द्यायचा हा सर्वस्वी त्या पक्षाचा प्रश्न आहे. मात्र, () यांच्या प्रवेशानं शिवसेनेची महिला आघाडी मजबूत होईल असं म्हणणं म्हणजे बाळासाहेबांनी ज्या महिला कार्यकर्त्यांना ‘रणरागिणी’ अशी उपमा दिली, त्या लढवय्या कार्यकर्त्यांचं अवमूल्यन करण्यासारखं आहे,’ अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते () यांनी केली आहे.

राज्यपाल नामनिर्देशित जागेवर शिवसेनेनं उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिफारस केली आहे. त्या पार्श्वभूमीवर उर्मिला यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: उर्मिला यांचं पक्षात स्वागत केलं. उर्मिला यांच्या प्रवेशानं शिवसेनेची महिला आघाडी मजबूत होईल, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या नेत्यांनी दिली आहे. त्या वक्तव्यावर दरेकर यांनी जोरदार टीका केली आहे.

वाचा:

‘शिवसेनेच्या वाढीसाठी आजवर अनेक महिला कार्यकर्त्यांनी घरादाराची पर्वा न करता काम केलं आहे. रस्त्यावरील आंदोलनात या कार्यकर्त्या नेहमी आघाडीवर असायच्या. आदरणीय बाळासाहेबांनी या कार्यकर्त्यांना रणरागिणी अशी उपमा दिली होती. म्हणून शिवसेनेच्या महिलां कार्यकर्त्यांना जी उपमा दिली व ज्या रस्त्यावर आंदोलनात आघाडीवर असायच्या. मीना कांबळी, उमेशा पवार, सुधाताई चुरी अशा अनेक कार्यकर्त्यांचा यात समावेश आहे. शिवसेनाप्रमुखांनी नेहमीच त्यांचा सन्मान केला. त्यामुळं उर्मिला यांच्या येण्यामुळं शिवसेनेची महिला आघाडी मजबूत होईल असं म्हणणं म्हणजे त्या जुन्या कार्यकर्त्यांच्या कामावर पाणी फेरण्याचा हा प्रकार आहे,’ असं दरेकर म्हणाले.

वाचा:

‘शिवसेनेच बदलतं स्वरूप आता ठळकपणे दिसू लागलंय. प्रियांका चतुर्वेदी यांना खासदार केलं गेलं. काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढलेल्या व्यक्तीला पक्षात प्रवेश दिला जातोय. पक्षाची मूळ विचारधारा सोडून केवळ सत्तेच्या समीकरणाभोवती शिवसेनेचे राजकारण फिरताना दिसत आहे,’ असंही दरेकर म्हणाले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here