श्रीनगर: जेएनयूची (JNU) माजी विद्यार्थिनी (Shehla Rashid) ही असल्याचे तिच्या वडिलांनी म्हटले होते. त्यानंतर शेहलाने आज मंगळवारी ट्विटवर ट्विट करत वडिलांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे केले. आपल्या वडिलांनी जे काही म्हटलेले आहे, ते माझ्याविषयी नसून त्यांच्याच विषयी आहे, असे शेहलाने म्हटले आहे. तत्पूर्वी आपले पिता हे घरगुती हिंसा करणारे असल्याचे शेहलाने म्हटले होते. आपल्या पित्याच्या अत्याचाराविरोधात बहीण आणि आई दोघी एकत्र झाल्याचेही तिने म्हटले आहे. ( tweets against her father)

शेहला रशीदने आपल्या वडिलांच्या वक्तव्यावर ट्विट करत म्हटले की, ‘माझे वडील स्पष्टपणे माझ्याविषयी असे वक्तव्य देतील. मात्र या वेळी ते माझ्याविषयी नाही आहे. हे त्यांच्याच विषयी आहे.’ शेहलाच्या वडिलांनी तिच्यावर देशविरोधी हालचालींमध्ये सहभागी असल्याचा आरोप लावला होता.

शेहलाने आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘तुम्ही दिलेल्या समर्थानासाठी आम्ही आभारी आहोत. आम्ही आता ना कोणत्या टीव्ही चॅनेलवर मुलाखत देणार, ना कोणत्या चर्चेत भाग घेणार. कारण आपल्या कुटुंबीतील एखाद्या सदस्याची सार्वजनिक प्रतिमा मलिन करणे हे आमच्या संस्कारांच्या विरोधात आहे. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी खाली दिलेले वक्तव्य प्रसिद्ध करू शकतात.’

शेहलाने ट्विटरवर एक आदेशही शेयर केला आहे. कोर्टाने वडिलांच्या घरी येण्यावर बंदी घातल्याचे तिने यात म्हटले आहे. शेहलाच्या पोस्ट नंतर या प्रकरणी चर्चा सुरू झाली आहे. कारण एक दिवसापूर्वीच शेहलाच्या वडिलांनी शेहलावर गंभीर आरोप केले होते. यानंतर पोलिस महासंचालकांना सुरक्षा पुरवण्याबाबत विनंती करण्यात आली.

माझ्या जीवाला माझ्याच मुलीपासून धोका आहे, अशी तक्रार शेहलाचे वडील यांनी सोमवारी दाखल केली आहे. माझी मुलगी देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा त्यांचा आरोप आहे. या कारवायांमध्ये अब्दुल रशीद यांची पत्नी जुबेदा शौर, मोठी मुलगी असमां रशीद आणि एक पोलिस कर्मचारी साकिब अहमद यांचा सहभाग असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

क्लिक करा आणि वाचा-

क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here