मुंबईः यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. पक्ष प्रवेशानंतर उर्मिला मातोंडकर यांनी पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतनं केलेल्या टीकेवरही उर्मिला मातोंडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एका मुलाखतीत कंगना राणावतनं उर्मिला मातोंडकर यांचा उल्लेख सॉफ्ट पॉर्न स्टार असा केला होता. कंगनानं केलेल्या या टीकेनंतर मोठा वादंग निर्माण झाला होता. उर्मिला यांनीही कंगनाला प्रत्युत्तर न देणंच पसंत केलं होतं. त्याचबरोबर, कंगनानं सुशांतसिंह राजपुत प्रकरणानंतर शिवसेनेवरही सातत्याने टीका केली होती. या मुद्द्यावरून उर्मिला यांना कंगना प्रकरणावर प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिलं आहे.

सातत्याने शिवसेनेवर व महाविकास आघाडीवर टीका करत असतात कंगनाच्या या टीकेला शिवसेनेच्या सदस्या व अभिनेत्री म्हणून उत्तर देणार का? असं प्रश्न विचारला असता त्यांनी सरळ ‘नाही’, असं उत्तर दिलं आहे. ‘कंगनावर बोलायला पाहिजे त्यापेक्षा जास्त बोललं गेलंय’, असं त्या म्हणाल्या आहेत.

दरम्यान, ज्या मुलाखतीवरुन कंगनानं उर्मिला यांच्यावर टीका केली होती त्याबाबतही उर्मिला मातोंडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘कंगनाला उत्तर देण्यासाठी मी मुलाखत दिली नव्हती. प्रश्नांच्या ओघात कंगनाबद्दल जास्त बोललं गेलं,’ असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. शिवाय, ‘टीका करायला लोकशाही आहे. कंगनालाही अभिव्यक्ती स्वांतत्र्य आहे. मी त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही. या विषयाला नको तितकं महत्त्व दिलं गेलं आहे,’ असंही त्यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here