मुंबईः दिवाळीनंतर सुरु झालेल्या करोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर आज राज्यातील नवीन रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. आज राज्यात ४ हजार ९३० करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत तर, ९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ()

दिवाळीत बाजारात झालेली गर्दी, नातेवाईकांच्या भेटीगाठी यामुळे पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात होती. दिवाळीनंतर रोज रुग्ण वाढू लागले होते त्यामुळं चिंता वाढली होती. मात्र, गेल्या दोन- तीन दिवसांपासून हा आकडा पुन्हा खाली उतरला आहे. राज्यात सध्या ८९ हजार ०९८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, राज्यातील रुग्ण बरे होण्याचा टक्का ९२. ४९ टक्के इतका झाला आहे.

आज राज्यात एकूण ४ हजार ९३० नवीन रुग्ण सापडले आहेत तर, ६ हजार २९० रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. राज्यात एकूण करोना बाधितांची संख्या १८,२८,८२६ इतकी झाली असून करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या १६ लाख ९१ हजार ४१२ इतकी झाली आहे. करोना मृतांचा आकडा दिलासा देणारा ठरला आहे. आज राज्यात ९५ करोना बाधितांचा मृत्यू झाला असून एकूण करोना मृतांचा आकडा ४७ हजार २४६ इतका झाला आहे. तर, राज्यातील मृत्यूदर २.५८ % एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,०९,१५,६८३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,२८,८२६ (१६.७५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,३८,०८४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,४२० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here