कोल्हापूर: आंदोलन करत असतानाच पोलिसांनी स्वाभिमानीचे अध्यक्ष व माजी खासदार यांची कॉलर पकडली आणि आंदोलनाला वेगळे वळण लागले. संतप्त कार्यकर्ते पोलिसांच्या अंगावर धावल्याने आंदोलनस्थळी तणावाची परिस्थिती निर्माण झाली. कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा प्रकार घडला. ( targets and home minister )

वाचा:

दिल्लीत सध्या केंद्र सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी धडक मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने सुरू असतानाच अचानक एका गाडीतून तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतिकात्मक पुतळा आणण्यात आला. या पुतळ्याचे कार्यकर्त्यांनी दहन करू नये यासाठी पोलिसांनी तो हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि आंदोलकांत काही प्रमाणात झटापट झाली.

वाचा:

पोलीस आणि आंदोलकांत झटापट सुरू असतानाच अचानक एका पोलीस अधिकाऱ्याने माजी खासदार शेट्टी यांच्या कॉलरला हात घातला. त्यांना बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. हे पाहताच कार्यकर्ते संतप्त झाले. त्यामुळे आंदोलक पोलिसांच्या अंगावर धावले. यामुळे पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यातील झटापट आणखी वाढली. काहींनी धक्काबुक्की केली. यातून एकदम तणावाची परिस्थिती निर्माण झाली. संतप्त कार्यकर्ते पोलिसांच्या निषेधाची घोषणा देऊ लागले. यातून गोंधळ सुरू झाला.

वाचा:

राजू शेट्टी यांची कॉलर धरणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने दिलगिरी व्यक्त करावी, अशी मागणी त्यांचे कार्यकर्ते करू लागले. नंतर शेट्टींनी त्यांना शांत केले. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. दरम्यान, यावेळी बोलताना शेट्टी म्हणाले, दिल्लीत शेतकरी आंदोलन करत आहेत. सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे. हे असेच सुरू राहिले तर आम्ही गृहमंत्री अमित शहा यांच्या कॉलरला हात लावण्यास मागेपुढे पाहणार नाही. दोन दिवसात जर केंद्राने याबाबत सकारात्मक निर्णय घेतला नाही तर राज्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल.

दरम्यान, केंद्र सरकारचा निषेध करत आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने राज्यातील विविध जिल्ह्यांत निदर्शने करण्यात आली. या निदर्शनांच्या माध्यमातून दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचे समर्थन करण्यात आले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here