कराची : भारतामध्ये पुढच्या वर्षी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. पण या विश्वचषकाच्या आयोजनाला पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने (पीसीबी) विरोध केला आहे. हा विश्वचषक भारतामध्ये न खेळवता ते युएईमध्ये खेळवावा, अशी मागणी पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने केली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाचे डोके ठिकाणावर आहे ना, अशी प्रतिक्रीया भारतीय चाहत्यांकडून व्यक्त होत आहे.

करोनामुळे ऑस्ट्रेलियातील ट्वेन्टी-२० विश्वचषक रद्द करावा लागला होता. त्याचबरोबर भारतातील ट्वेन्टी-२० विश्वचषक पुढे ढकलण्यात आला आहे. हा विश्वचषक भारतामध्ये पहिल्या सहा महिन्यांमध्ये खेळवण्यात आला होता. पण या स्पर्धेसाठीच्या पात्रता फेरी पूर्ण झाल्या नसल्यामुळे हा विश्वचषक पुढे ढकलण्याचा निर्णय आयसीसीने घेतला होता. पण त्यानंतर आता हा विश्वचषक भारतामधून रद्द करावा, असा कांगावा करायला पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने सुरुवात करत अकलेचे तारे तोडले आहेत.

पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळातील मुख्य कार्यकारी अधिकारी वसिम खान यांनी भारतामधील ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या आयोजनाला विरोध केला आहे. भारतामध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे आयोजन केले तर पाकिस्तानच्या संघाला काही समस्या जाणवतील, असा त्यांच्या बोलण्याचा रोख आहे. त्यामुळेत भारतातील हा विश्वचषर युएईमध्ये खेळवण्यात यावा, अशी मागणी खान यांनी केली आहे.

वसिम खान यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले की, ” सध्याच्या घडीला करोनाचे वातावरण जगभरात आहे. भारतामध्येही करोनाचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे भारतामध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे आयोजन यशस्वीपणे होऊ शकेल की नाही, याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे भारतात विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यात येऊ नये, त्यापेक्षा या विश्वचषकाचे आयोजन हे युएईमध्ये करण्यात यावे.”

करोनानंतर भारताने पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेला नकार दिला होता. त्याचबरोबर आयपीएल युएईमध्ये झाली असली तरी त्यामध्ये एकाही पाकिस्तानच्या खेळाडूला प्रवेश देण्यात आला नव्हता. त्यामुळे पाकिस्ता़नचे क्रिकेट मंडळ आपला राग अशापद्धतीने व्यक्त करत असल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष एहसान मणी यांनी आयसीसीला एक पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी आयसीसीकडे विश्वचषकासाठीचा व्हिसा मिळवताना आम्हाला समस्या येणार नाही, असे आश्वासन मागितले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here