वाचा:
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील काही मतदान केंद्रांची पाहणी केली. सांगली शहरातील चांदणी चौक परिसरातील मतदान केंद्राची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘राज्यात आज मतदान होत असलेल्या विधानपरिषदेच्या सर्वच्या सर्व सहा जागा भाजप मोठ्या मताधिक्क्याने जिंकणार आहे. पुणे पदवीधर हा भाजपचा हक्काचा मतदारसंघ आहे. एक अपवाद वगळता गेली ३६ वर्षे या मतदारसंघात भाजपचे वर्चस्व कायम आहे. याहीवेळी ही परंपरा कायम राहील. शिक्षक मतदार संघही पुन्हा आम्ही खेचून आणू. विधानपरिषदेत सध्या असलेल्या ६० आमदारांपैकी २५ आमदार भाजपचे आहेत. आणखी सहा जागा जिंकून भाजपचे संख्याबळ ३१ एवढे होईल. तुम्ही तिघे एकत्र या, नाहीतर चौघे एकत्र या. आम्ही एकटेच तुम्हाला पुरेसे आहोत, हे आम्ही महाराष्ट्राला दाखवून देऊ.’
वाचा:
पाटील यांनी मतदानानंतर कोल्हापुरात प्रतिक्रिया देतानाही आघाडीला लक्ष्य केले. पुणे पदवीधर आणि शिक्षक याबरोबरच राज्यातील सर्वच मतदारसंघात भाजपचा विजय निश्चित आहे. यामुळे ‘ ‘ला धडा मिळणार आहे, असे पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटील यांच्या दाव्यानंतर गृहराज्यमंत्री यांनीही पाटील यांना टोला हाणत महाविकास आघाडीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. ‘पुणे पदवीधर मतदार संघात विजयाची हॅट्ट्रिक करायला निघालेले चंद्रकांत पाटील रनआऊट नव्हे तर थेट क्लीनबोल्ड होणार आहेत, असे सतेज पाटील म्हणाले.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times