वाचा:
तालुक्यातील सावर्डे येथील राजलक्ष्मी जाधव हिचे वडिल हे शाळेत लिपीक आहेत. त्यांना हृदयविकाराचा त्रास आहे. त्यामुळे ते उपचारासाठी अनेकदा कोल्हापूरला येत असतात. आज त्यांच्यासमवेत राजलक्ष्मी देखील आली होती. दुपारी दोघेही दुचाकीवरून कोल्हापूरकडे येत होते. कसबा बावडा ते शिये रस्त्यावर ऊसाचा ट्रॅक्टर जात होता. साखर कारखान्याकडे वळताना ट्रॅक्टरचालक ओव्हरटेक करत असतानाच अरूंद रस्त्यामुळे जाधव यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ते खाली पडले. दुचाकी घसरल्याने मागे बसलेली राजलक्ष्मीही खाली पडली, पण त्याचवेळी ट्रॅक्टरची ट्रॉली तिच्या अंगावरून गेली. त्यामध्ये ती जागीच ठार झाली. डोळ्यासमोरच मुलीचा अंत झाल्याचे पाहून वडिलांनी हंबरडा फोडला. जखमी अवस्थेत असतानाही तिला वाचविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण तोपर्यंत नियतीने डाव साधला होता.
वाचा:
राजलक्ष्मी बीएचएमएसचे शिक्षण घेत होती. कालच अंतिम वर्षाचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये ती उत्तीर्ण झाली. मुलगी डॉक्टर झाल्याचा आनंद आई वडिलांना गगनात मावेनासा झाला होता पण, दुसऱ्याच दिवशी काळाने तिच्यावर झडप घातली. त्यामुळे चोवीस तासात घरातील आनंदाच्या वातावरणावर दु:खाचे सावट पसरले आहे. डॉक्टर होऊन समाजसेवा करण्याच्या राजलक्ष्मीच्या स्वप्नांचा या अपघाताने चक्काचूर झाला.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times