नवी दिल्ली: भारतीय नौदलाने () ब्राह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राची () मंगळवारी बंगालच्या उपसागरात एका विनाशिकेवरून यशस्वी चाचणी घेतली, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. भारतीय सैन्यातील तिन्ही दलांकडून या क्षेपणास्त्राची (जमीन, पाणी, हवेत) चाचणी घेण्यात येत आहे. त्याअंतर्गत ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या नौदल आवृत्तीची चाचणी घेण्यात आली. भारतीय नौदलाने सहा आठवड्यांपूर्वी अरबी समुद्रात क्षेपणास्त्राची अशीच चाचणी घेतली होती.

भारतीय नौदलाच्या आयएनएस रणविजय या युद्ध नौकेवरून जहाविरोधी ब्रह्मोस क्षेपणास्त्रात यशस्वी चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्राने अधिक मारक क्षमतेत अचूक लक्ष्य वेधले, अशी माहिती नौदलाचे प्रवक्ता कमांडर विवेक मोदवाल यांनी दिली.

ब्रह्मोस क्षेपणास्त्राची मूळ मारक क्षमता २९० किमी

भारत-रशिया यांच्या संयुक्त विद्यमाने ब्रह्मोस एरोस्पेसने सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्रांची निर्मिती केली आहे. ही क्षेपणास्त्र पाणबुडी, जहाजे किंवा जमिनीवरून डागली जाऊ शकतात. भारतीय लष्कराने २४ नोव्हेंबरला जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. या क्षेपणास्त्राचा वेग हा ध्वनीच्या वेगापेक्षा तीन पट अधिक आहे. जमिनीवरून मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची मारक क्षमता ही ४०० किमीपर्यंत वाढवण्यात आली आहे. या क्षेपणास्त्राची मूत्र मारक क्षमता २९० किमी इतकी आहे.

भारताने चीनच्या सीमेवर तैनात केली आहेत. भारताने लडाख आणि अरुणाचल प्रदेशमध्ये चीनला लागून असलेल्या प्रत्यक्ष ताबा नियंत्रण रेषेजवळ अनेक महत्त्वाच्या रणनितीक ठिकाणी ब्राह्मोस क्षेपणास्त्र तैनात केली आहेत. गेल्या अडीच महिन्यांत भारताने रेडिएशन विरोधी क्षेपणास्त्र रुद्रम -१ यासह अनेक क्षेपणास्त्रांची चाचणी केली आहे. रुद्रम-वन ही क्षेपणास्त्र २०२२ पर्यंत सेवेत दाखल होण्याती शक्यता आहे.

सुखोई विमानांवर ब्रह्मोस तैनात करण्याची योजना

भारतीय हवाई दलाने ३० ऑक्टोबरला बंगालच्या उपसागरात सुखोई लढाऊ विमानावरील क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. भारतीय हवाई दल ४० हून अधिक सुखोई लढाऊ विमानांवर ब्राह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्रे तैनात करणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here