वाचा:
ही घटना एम.आय.डी.सी. ( ) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा टेंभरी येथे २८ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दरम्यान घडली. दिनेश हा मूळ मध्य प्रदेशातील रहिवासी आहे. गेल्या काही काळापासून तो पत्नी व मुलांसह टेंभरी गावात वास्तव्यास आहे. तो इंडोरामा कंपनीत ऑपरेटर म्हणून काम करीत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आठ वर्षांपूर्वी दिनेश व सुषमा यांचे लग्न झाले. त्यांना अनुक्रमे सात, पाच आणि दोन वर्षे वयाची तीन मुले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुषमा दिनेशला शरीर संबंधास नकार देत होती. यामुळे त्यांच्यात वाद सुरू होते. यापूर्वीही त्याने तिली मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. शनिवारी, २८ नोव्हेंबर रोजी त्यांच्यात याच मुद्द्यावर परत एकदा भांडण झाले आणि रागाच्या भरात दिनेशने सुषमा गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर सुषमाचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला असा बनाव केला. परंतु, सुषमाच्या शवविच्छेदनाच्या अहवालात तिचा मृत्यू हृदय थांबल्याने नाही तर गळ दाबल्याने झाल्याचे समोर आले.
वाचा:
पोलिसांनी दिनेशला ताब्यात घेतले व त्याला पोलिसी हिसका दाखविताच त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आणि या कृत्यामागचे कारणही स्पष्ट केले. पोलिसांनी दिनेशवर हत्येच्या आरोपाखाली भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय सुषमाच्या मृत्यूचे खोटे कारण पुढे केल्याच्या आरोपाखाली भादंविच्या कलम १७७ अन्वयेसुद्धा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times