यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे म्हणाले, ‘केंद्र सरकारने दिल्ली येथे शेतकरी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. पाण्याचे फवारे मारले. अश्रूधुराच्य नळकांड्या फोडून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. शेतक-यांच्या विरोधानंतरही संसदेत मंजूर केलेली कृषी विधेयके ताबडतोब रद्द करावित. शेतक-यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने करू नये. शेतक-यांचा आक्रोश सरकारला परवडणार नाही. तातडीने कृषी विधेयके रद्द न केल्यास केंद्रीय मंत्र्यांना सांगली जिल्ह्यात फिरू देणार नाही.’
यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांच्यासह पोपट मोरे, भागवत जाधव, संदीप राजोबा, दामाजी डुबल, बाळासाहेब जाधव, जोतिराम जाधव, प्रताप पाटील, आदी उपस्थित होते.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times