अभिनेते सनी देओल (वय ६४ ) यांच्या खांद्यावर मुंबईत अलिकडेच शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर काही काळ विश्रांती घेण्यासाठी ते मनाली येथील त्यांच्या फॉर्म हाऊसवर आले. गेल्या काही दिवसांपासून ते इथेत आहेत. दरम्यान, ३ डिसेंबरला सनी देओल आपल्या मित्रासह मुंबईला परत जाणार होते. पण ते आता करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. हिमाचल प्रदेशच्या आरोग्य सचिवांनी ही माहिती दिली.
हिमाचल प्रदेशशी सनी देओलचा यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. ते अनेकदा आपला वेळ घालवण्यासाठी मनालीला येतात आहे. यावेळीही खांद्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर ते विश्रांतीसाठी मनालीला आले आहेत. यावेळी, त्याचे कुटुंबातील सदस्यही त्याच्याबरोबर आले. पण ते काही दिवसांपूर्वीच इथून गेले. पण आता करोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने त्यांना काही दिवस तिथेच रहावं लागणार आहे. सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times