म. टा. प्रतिनिधी, मुंबईः महाराष्ट्रात राजकारणी अथवा प्रभावशाली व्यक्तींनी कितीही मागणी केली तरीही करोनाची लस ही प्राधान्याने करोनायोद्ध्यांनाच प्रथम उपलब्ध करून देण्यात येईल, असे आरोग्यमंत्री यांनी मंगळवारी स्पष्ट केले. जगभरात विविध कंपन्या प्रथम बाजारात आणण्यासाठी स्पर्धा करीत असून, दुसरीकडे करोना लस पहिल्यांदा मिळावी, यासाठी राजकीय पुढाऱ्यांची मागणी वाढू लागल्याचे बोलले जात आहे.

महाराष्ट्रात प्रथम लस देण्यात येणाऱ्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. राज्य सरकारच्या निकषांनुसार राजकारणातील पुढारी मंडळी ही सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या करोना सेवकांच्या प्राधान्यक्रमाच्या कार्यकक्षेत येत नाहीत. सीरम-ऑक्सफर्ड लस चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात अनेकांनी सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, सर्वांत आधी आपणास लस मिळावी अशी कुणीही मागणी केलेली नाही. पण प्रथम श्रेणीतील डॉक्टर, पोलिस आणि करोनावर काम करणाऱ्या सेवकांनाच प्रथम लस दिली जाणार आहे. यावर संपूर्ण नियंत्रण हे केंद्र आणि राज्य सरकारचे असून प्रोटोकॉलनुसारच लस देण्यासंदर्भात विचार केला जाईल, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here