पालघरः पालघर आणि सफाळे रेल्वे स्थानकात आज संतप्त प्रवाशांनी केलं. प्रवाशांनी मुंबईकडे जाणारी राजधानी एक्स्प्रेस रोखून धरली होती. डहाणूहून चर्चेगेटकडे सुटणारी पहाटेची पहिली लोकल रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे. या निर्णयाविरोधात आज प्रवाशांनी रेल रोको आंदोलनं पुकारलं होतं.

रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात केळवे रोड, पालघर आणि सफाळे रेल्वे स्थानकात प्रवाशांनी रेल रोको आंदोलन केलं होतं. यावेळी संतप्त प्रवाशांनी काही काळ मुंबईकडे जाणाऱ्या ट्रेन अडवून धरल्या होत्या. त्यानंतर पालघर रेल्वे स्टेशन मास्तरांनी प्रवाशांच्या मागण्यांचे निवेदन मुंबई सेंट्रलला पाठवण्यात येईल व प्रवाशांच्या मागण्यांवर विचार करण्यात येईल, असं आश्वासन दिल्यानंतर प्रवाशांनी आंदोलन मागे घेतलं आहे.

सफाळे, केळवे रोड या स्थानकात प्रवाशांनी रुळांवर उतरुन केलेल्या आंदोलनामुळं सर्व पश्चिम रेल्वे मार्गावरील गाड्या रेल्वे स्थानकातच अडकून पडल्या होत्या. आंदोलन मागे घेतल्यानंतर पश्चिम रेल्वेवरील वाहतूक पूर्ववत झाली आहे.

मुंबईच्या दिशेने पहिल्या पाळीवर कामाला जाण्यासाठी सकाळची पहिली लोकल नुकतीच सुरु करण्यात आली होती. ती रद्द करण्याचा तुघलकी निर्णय रेल्वेप्रशासनाने घेतला आहे. त्यानिर्णयाचा डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था जाहिर निषेध करते आणि तो निर्णय परत घेण्याचे रेल्वे प्रशासनाला आवाहन करते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here