मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज बुधवारी मुंबईत उद्योजकांची भेट घेणार आहेत. मुंबई शेअर बाजारात योगींच्या हस्ते होणार आहे. या निमित्त योगी उद्योजकांशी संवाद साधणार असून उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे आवाहन करणार आहेत. (Uttar Pradesh CM Attending LMC Listing Event at Today in Mumbai) मंगळवारी योगी आदित्यनाथांनी बाॅलिवुडमधील कलाकारांची भेट घेतली होती. नोए़डामध्ये फ्लिमसिटी साकारण्यात येत आहे.

आज मुंबई शेअर बाजारात (BSE) लखनऊ म्युनिसिपल कॉर्पोरेशन (LMC Bond) बॉण्डची नोंदणी होणार आहे. या बॉण्डला मानांकन संस्थांनी एए मानांकन (AA) दिले आहे. या बॉण्डमधून मिळणारा निधी उत्तर प्रदेशातील विकास कामांसाठी वापरला जाणार आहे. या बॉण्डमुळे लखनऊ महापालिकेची प्रतिमा सुधारणार असून आजूबाजूच्या गाझियाबाद, वाराणसी, कानपुर या महापालिकांना स्वतःचे बॉण्ड बाजारात आणण्यासाठी प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आहे.

यूपीतील बुंदेलखंडमध्ये डिफेन्स कॉरिडोर प्रस्तावित आहेत. तब्बल ५००० हेक्टरवर साकारल्या जाणाऱ्या या डिफेन्स कॉरिडोरमधून ५०००० कोटींची गुंतवणूक होईल, असा विश्वास यूपी सरकारने व्यक्त केला आहे. तसेच हल्दिया ते वाराणसी असा १३६० किमीचा अंतर्गत जलवाहतुकीचा मार्ग तयार केला जाणार आहे.

लखनऊ म्युनिसिपल कॉर्पोरेशन बॉण्डसाठी गेल्या महिन्याभरापासून उत्तर प्रदेश सरकारने जोरदार कॅम्पेन केले आहे. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने केलेल्या आर्थिक सुधारणांची माहिती दिली जात आहे. विशेषता मागास भागांच्या विकासासाठी सरकारने स्वतंत्र धोरण तयार केले आहे. बुंदेलखंड, पूर्वांचल आणि मध्यांचल या भांगामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना जलदगतीने मंजुरी आणि सुविधा दिल्या जातील.

याआधी लखनऊ म्युनिसिपल कॉर्पोरेशन बॉण्ड १३ नोव्हेंबर २०२० रोजी लॉंच झाला होता. तो ४.५ पट सबस्क्राईब झाला. त्यातून २०० कोटींचा निधी उभरन्ह्यात आला. यात १० वर्षांसाठी ८.५ टक्के व्याजदर देण्यात आला. या बॉण्डमुळे लखनऊ देशातील ९ वी महापालिका ठरणार आहे. अमृत योजनेत भांडवली बाजारात निधी उभारण्यासाठी बॉण्ड इश्यू करण्याची परवानगी महापालिकांना देण्यात आली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

108 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here