आजच्या दरवाढीने मुंबईत पेट्रोलचा भाव ८९.१६ रुपये झाला आहे. डिझेलचा एक लीटरचा भाव ७९.२२ रुपये आहे. दिल्लीत एक लीटर पेट्रोलसाठी ८२.४९ रुपये असून डिझेलचा भाव ७२.६५ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोल ८५.४४ रुपये असून डिझेल ७८.०६ रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोलचा भाव ८४.०२ रुपये असून डिझेल ७६.२२ रुपये आहे.
आज जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. अमेरिकेत तेल साठा वाढवला जात असताना आज तेलाच्या किमतीत घसरण झुलाय आहे. ब्रेंट क्रूडचा भाव २७ सेंट्सने कमी झाला आणि ४७.१५ डॉलर झाला. वेस्ट टेक्सासमध्ये क्रूडचा भाव २९ सेंट्सने कमी होऊन ४४.२६ डॉलर प्रती बॅरल झाला. अमेरिकन पेट्रोलियम इन्स्टिट्युटच्या आकडेवारीनुसार २७ नोव्हेंबर रोजी संस्थेकडे ४.१४६ दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाचा साठा होता. याआधी तो ३.८ दशलक्ष बॅरल इतका साठा होता. त्यामुळे तेलाच्या भावात घसरण झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
मागील दहा दिवसांत पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ केली आहे. या दरवाढीने मागील १० दिवसांत पेट्रोल १.४३ रुपयांनी महागले आहे. तर डिझेलमध्ये २.१९ रुपयाची वाढ झाली आहे. याआधी तब्बल ४८ दिवस पेट्रोलियम कंपन्यांनी पेरोल डिझेलचे दर स्थिर ठेवले होते. त्यानंतर ठराविक दिवशी कंपन्यांनी इंधन दर वाढवले.
पेट्रोल आणि डिझेल दर हे जातीक बाजाराशी संलग्न केले आहे. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधन दराचा आढावा घेतला जातो. तेल आयातीचा खर्च आणि चलन विनिमय दर तसेच स्थानिक पातळीवरील कर यावरून पेट्रोल आणि डिझेलचा किरकोळ विक्री भाव ठरवला जातो. भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांकडून दररोज इंधन दर निश्चित केला जातो. आपल्या शहरातील इंधन दर जाणून घेण्यासाठी या तिन्ही कंपन्यांना एसएमएस पाठवून जाणून घेता येईल. इंडियन ऑइलसाठी ९२२४९९२२४९, भारत पेट्रोलियमसाठी ९२२३११२२२२ आणि हिंदुस्थान पेट्रोलियमसाठी ९२२२२०११२२ या मोबाईल क्रमांकावर एसएमएस पाठवून माहिती घेता येईल.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times