मुंबई- आणि ही भारतातील आवडत्या कपलपैकी एक आहे. सिनेमा आणि क्रिकेट हे दोन्ही क्षेत्र भारतात सर्वाधिक लोकप्रिय आहेत. याचमुळे देशातील आवडत्या सेलिब्रिटींमध्ये त्या दोघांचं नाव आवर्जुन घेतलं जातं. दोघंही वेगवेगळ्या क्षेत्रातले असले तरी आपआपल्या क्षेत्रात अग्रणी आहेत. याचमुळे व्यावसायिक आयुष्यात ते इतके पैसे कमावतात की इतरांना त्यांचा हेवा वाटेल.

फोर्ब्स आणि जीक्यूच्या आकडेवारीनुसार जानेवारी २०२० मध्ये विराट आणि अनुष्काची एकूण मालमत्ता सुमारे १२०० कोटी होती. यानुसार सध्या ती सर्वात श्रीमंत सेलिब्रिटी जोडप्यांपैकी एक आहे. वर्ष २०१९ मध्ये फोर्ब्सच्या १०० सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत विराट कोहलीचं नाव होतं. एका वर्षात त्याने २५२ कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती.

२०१९ मध्ये विराट कोहलीकडे सुमारे ९०० कोटींची एकूण मालमत्ता होती. त्यानंतर विराटने बर्‍याच ब्रँडच्या एण्डॉसमेन्ट आणि आयपीएलमध्ये पैसे कमावले. आयपीएलसाठी यावर्षी विराटला १८ कोटी रुपये मिळाले असून तो आयपीएलमधील सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू होता. याशिवाय त्याला बीसीसीआयकडून वार्षिक सात कोटी रुपये पगारही मिळतो. एवढंच नाही तर विराटचे स्वत:चे दोन रेस्टॉरन्टदेखील आहेत. या सर्व गोष्टी मिळून विराट कोहलीची एकूण मालमत्ता सुमारे १ हजार कोटी रुपयांच्या आसपास आहे.

अनुष्का शर्माबद्दल बोलायचं झालं तर तिने वर्ष २०१९ मध्ये २८ कोटींपेक्षा जास्त कमाई केली. असं म्हटलं जातं की, अनुष्काची एकूण मालमत्ता ३५० कोटींपेक्षा जास्त असावी. २०१८ पासून अनुष्काने कोणताही सिनेमा साइन केलेला नसला तरी तिच्या प्रॉडक्शन हाऊसमधून अनेक सिनेमांची आणि वेबसीरिजची निर्मिती करण्यात आली. याशिवाय अनुष्काने स्वत:चा फॅशन ब्रँडही बाजारात आणला आहे. विराट आणि अनुष्काचा मुंबईत ३४ कोटींचं एक आलीशान अपार्टमेन्ट आहे. याशिवाय गुरगावमध्येही या जोडप्याची ८० कोटींची मालमत्ता आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here