उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या फिल्म सिटीवरून राजकीय वातावरण तापलं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही बॉलिवूडला बाहेर नेऊ देणार नसल्याचा इशारा दिला आहे. या सगळ्या प्रश्नांवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं आहे.
‘उत्तर प्रदेशमध्ये जागतिक स्तरावरील फिल्म सिटी उभारण्याची आमची योजना आहे. यासाठी आम्ही या क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत चर्चाही केली आहे. ते सुद्धा या फिल्मसिटीसाठी उत्सुक आहेत. या प्रस्तावित फिल्म सिटीसाठी आम्ही नोएडा येथे १ हजार हेक्टर जमीन खरेदी करणार आहोत. फिल्मसिटीची ही जागा जेवर विमानतळाजवळ आहे. ठिकाणाहून उत्तर प्रदेशसह आणि देशातील इतर भागांशी जोडणारी दळणवळणांची सर्व साधनं असतील,’ अशी माहिती त्यांनी दिली आहे.
बॉलिवूड इंडस्ट्री उत्तर प्रदेशला घेऊन जाणार असल्याच्या चर्चांवर योगी आदित्यनाथ यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘आम्ही इथे काहीही घेऊन जायला आलेलो नाहीये. आम्ही नवीन तयार करण्यासाठी आलोय. ही खुली स्पर्धा आहे. सुरक्षा, समाजाला चांगलं वातावरण देण्याची गरज आहे. ती प्रत्येकानं दिली पाहीजे. मुंबई फिल्मसिटी आपलं काम करेल. यूपीतील फिल्मसिटी त्यांचं काम करेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times