अमेरिकेच्या चीन आर्थिक आणि सुरक्षा समिक्षा आयोगाने (USCC)आपल्या अहवालात ही बाब नमूद केली आहे. समोर आलेल्या काही साक्षी-पुराव्यावरून चीननेच या हल्ल्याचा कट केला होता. चीनकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर करण्यात आलेल्या या चिथावणीखोर कृत्याचे नेमक स्पष्ट कारण अद्याप समोर आले नाही. मात्र, भारताच्या सीमालगतच्या भागात रस्ते बांधण्यासाठीच अडथळा दूर करण्यासाठी चीनने हे पाऊल उचलले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. गलवान खोऱ्यातील हिंसाचारापूर्वी चीनचे संरक्षण मंत्री वेई यांनी आपल्या जवानांना युद्ध करण्यासाठी प्रोत्साहीत केले असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे.
वाचा:
USCC ची स्थापना वर्ष २००० मध्ये करण्यात आली. अमेरिका आणि चीन दरम्यान झालेल्या राष्ट्रीय सुरक्षा आणि व्यापाऱ्याच्या मुद्यांबाबत हा आयोग आढावा घेतो. चीनविरोधात प्रशासकीय निर्णय घेण्याचीही शिफारस हा आयोग करू शकतो.
वाचा:
वाचा:
वाचा:
भारत-चीन दरम्यान, लडाख येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर मे महिन्यापासून तणाव सुरू आहे. चीनच्या सैनिकांनी भारताच्या हद्दीत घुसखोरी करत भूभाग बळकावण्याचा प्रयत्न केला. भारतीय जवानांना चीनच्या या घुसखोरीला विरोध केला. जून महिन्यात चीनच्या सैनिकांनी भारतीय जवानांवर हल्ला होता. या हल्ल्यात भारताने २० जवान गमावले होते. या घटनेनंतर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर मोठा तणाव निर्माण झाला होता.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times