या आधीही झाली होती निर्माण करण्याचा प्रयत्न
उत्तर प्रदेशात याआधीही फिल्मिसिटी निर्माण करण्याची घोषणा झालेली आहे. मात्र, ती योजना पूर्णत्वाकडे जाऊ शकलेली नाही. फिल्मसिटीसाठी जमिनीचे वाटप देखील झाले, मात्र फिल्मसिटी निर्माण होऊ शकली नाही. या वेळी योगी आदित्यनाथ यांनी संपूर्ण तयारीनिशी घोषणा तर केली, मात्र त्यांच्या मार्गात अनेक अडथळे देखील आहेत. मंगळवारी इंडियन मर्चंट चेम्बर्स ऑफ कॉमर्सच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र मॅग्नेटिक राज्य आहे आणि उद्योगपतींना आज देखील या राज्याचे आकर्षक आहे, असे म्हटले आहे. यामुळे इथून कोणताही उद्योग बाहेर जाणार नाही असेही ठाकरे ठामपणे म्हणाले.
फिल्मसिटी उत्तर प्रदेशात जाऊ शकते का?
सर्वात मोठा प्रश्न आहे की योगी आदित्यनाथ फिल्ससिटी ग्रेटर नोएडात आणू शकतात का? ते आतापर्यंत चित्रपट अभिनेता अक्षय कुमार, कैलाश खेरसह अनेक नामांकित व्यक्तिमत्वांना भेटलेले आहेत. त्यांनी आज टाटा ग्रुपचे चेअरमन नटराजन चंद्रशेखरन यांचीही भेट घेतली. असे मानले जात आहे की योगी आदित्यनाथ राज्यात निर्माण होणाऱ्या फिल्मसिटीसाठी गुंतवणुकीचा आग्रह करत आहेत.
उत्तर प्रदेशात फिल्मसिटी आणण्याविषयी बोलायचे झाल्यास त्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास करावा लागेल आणि सध्या याचीच उत्तर प्रदेशात कमतरता आहे. चित्रपट उद्योगांमधील लोकांना सुविधांव्यतिरिक्त इतरही अनेक सोई मिळण्याची अपेक्षा असेल. अशात हा प्रश्न उपस्थित होतो की, राज्य सरकार कितपत या सर्व सोयी-सुविधा निर्माण करू शकेल?
मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्याने येथे दर्जेदार सोयीसुविधा निर्माण झालेल्या आहेत. तशा सोयीसुविधा उत्तर प्रदेशात नजिकच्या काळात निर्माण करण्यासाठी उत्तर प्रदेशला मुंबईला टक्कर द्यावी लागेल. हिम्मत असेल तर उद्योग उत्तर प्रदेशात नेऊन दाखवा असे आवाहन त्यामुळेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांना केले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
विशेष म्हणजे, बॉलिवूडचे बडे कलाकार उत्तर प्रदेशात शूटिंगसाठी जातील का हा देखील अतिशय महत्वाचा प्रश्न आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times