नगर: येथील साई संस्थानप्रमाणेच सर्वच मंदिरांत भारतीय संस्कृतीनुसार पोषाख लागू करावा, अशी मागणी सर्व मंदिर विश्वस्तांना हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याचे संघटक यांनी केले आहे. मंदिरातील पुजारी अर्धनग्न असतात, अशी अत्यंत अभ्यासहीन टीका करणारे तथाकथित पुरोगामी शिर्डी संस्थानने काय आवाहन केले आहे, हे पण नीट वाचत नाहीत, असे मतही त्यांनी नोंदवले. ( Latest News Updates )

वाचा:

शिर्डीतील येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी भारतीय पोषाखात यावे, अशी विनंतीवजा सूचना साईबाबा संस्थानानं भाविकांना केली आहे. यावरून चांगलाच वाद पेटला आहे. भूमाता ब्रिगेडच्या यांनी तर हा बोर्ड संस्थानने काढला नाही तर आम्ही येऊ काढू, असा इशाराच दिला आहे. त्यातच आता या वादात ‘ ‘ने उडी घेतली आहे. समितीने यासंदर्भात एक पत्र प्रसिद्धी केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ‘शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानने नुकतेच भाविकांना भारतीय संस्कृतीनुसार आणि सभ्यतापूर्ण वस्त्र परिधान करण्याचे आवाहन केले आहे. अशा प्रकारे केवळ साई संस्थाननेच नव्हे, तर देशभरातील अनेक मंदिरांमध्ये, तसेच गोव्यातील चर्चमध्ये ड्रेस कोड लागू करण्यात आलेला आहे. मंदिरांमध्ये लागू करण्यात आलेली पोशाखाबाबतची सूचना ही नग्नतेशी संबंधित नसून ती धर्मशास्त्रांशी संबंधित आहे. केवळ मंदिरच नव्हे, विविध क्षेत्रांमध्ये वस्त्रे कोणती घालावीत, याचे काही नियम ठरलेले आहे. त्या ठिकाणी ‘असेच वस्त्र का ?’, असे कोणी विचारत नाही; मात्र हिंदू देवस्थानांनी असे आवाहन केले की, लगेच अन्याय झाल्याची अभ्यासहीन ओरड केली जाते. मंदिरात श्रद्धेने येणारे भक्त आणि धर्मपरंपरा यांचे पालन करणारे भाविक या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत याचे आनंदाने पालन आणि स्वागतच करतील. साई संस्थानप्रमाणेच सर्वच मंदिरांत भारतीय संस्कृतीनुसार पोषाख लागू करावा,’ असे आवाहनही सर्व मंदिर विश्वस्तांना या पत्राद्वारे करण्यात आले आहे.

वाचा:

मंदिरातील पुजारी अर्धनग्न असतात, अशी अत्यंत अभ्यासहीन टीका करणारे तथाकथित पुरोगामी संस्थानने काय आवाहन केले आहे, हे पण नीट वाचत नाहीत. संस्थानने कोठेही तोकड्या कपड्यांचा उल्लेख केलेला नाही, पुरूष-महिला असा उल्लेख केला नाही, तरी अनेक दिवस प्रसिद्धी न मिळाल्याने काहींनी आक्षेप घेत केलेला हा ‘पब्लिसिटी स्टंट’ आहे. संस्थानने कोणतेही निर्बंध घातलेले नाहीत. सोवळे-उपरणे घालणाऱ्या पुजाऱ्यांना अर्धनग्न म्हणणे, ही बौद्धिक दिवाळखोरीच आहे. पोलिसांचा खाकी गणवेश, डॉक्टरांचा पांढरा कोट, वकिलांचा काळा कोट हे धर्मनिरपेक्ष शासनानेच योजलेले ‘ड्रेसकोड’ चालतात; मात्र मंदिरात केवळ संस्कृतीप्रधान वस्त्र घालण्याचे केवळ आवाहनही चालत नाही. हा पुरोगाम्यांचा भारतीय संस्कृतीद्वेषच आहे. श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या देवस्थानात सर्वच पुरुषांना कमरेच्यावर वस्त्र न घालण्याचा नियम आहे. तो महिलांना मुळीच नाही. येथे धर्मशास्त्रात महिलांच्या लज्जारक्षणाचा विचार केलेला आहे; मात्र हे समजून घेण्याची इच्छाच ज्यांना नाही, त्यांना काय सांगणार? असेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here