मुंबई: मुंबईत ‘नाइट लाइफ’ सुरू करण्याच्या निर्णयावर टीका करणाऱ्या नेत्यांवर राज्याचे पर्यावरणमंत्री यांनी जोरदार तोफ डागली आहे. ‘नाइट लाइफचा प्रयोग हा चांगल्या हेतूनं होत आहे. त्यामुळं अनेकांना रोजगार मिळणार आहे. शुद्ध हेतूनं सुरू होणाऱ्या या प्रयोगावर टीका करणाऱ्यांची मनं प्रदूषित आहेत,’ असा घणाघात आदित्य यांनी केला आहे.

मुंबईत ‘नाइट लाइफ’ सुरू करण्याची संकल्पना आदित्य ठाकरे यांनी यापूर्वीच मांडली होती. मात्र, त्यास मूर्तरूप आले नव्हते. आता राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखील सरकार आल्यानंतर हा प्रयोग प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. येत्या २६ जानेवारीच्या रात्रीपासून ‘नाइट लाइफ’ सुरू होणार असल्याची चर्चा आहे. सुरुवातीला काही भागांत हा प्रयोग केला जाणार आहे. त्यानंतर संपूर्ण शहराबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यांनी यावर टीका केली होती. ‘नाइट लाइफ’ सुरू झाल्यास मुंबईत ‘निर्भया’ बलात्कारासारख्या हजारो घटना होतील. ही आपली संस्कृती नाही, अशी टीका भाजपच्या काही नेत्यांनी केली होती. मुंबईकरांना त्रास झाल्यास या योजनेला कडाडून विरोध करण्याचा इशाराही भाजपनं दिला होता.

वाचा:

भाजपच्या या टीकेचा आदित्य ठाकरेंनी खरपूस समाचार घेतला. ‘महाविकास आघाडी जनतेच्या हितासाठी काम करतेय. लोकांच्या भल्याचे अनेक निर्णय घेतले जात आहेत. ‘नाइट लाइफ’चा प्रयोग रोजगार निर्मितीसाठी करत आहोत. आमचं मन स्वच्छ आहे. शुद्ध हेतूनंच आम्ही हा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर टीका करणाऱ्यांची मनं प्रदूषित आहेत,’ असा टोला आदित्य यांनी हाणला.

वाचा:

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here