आदेश अशोक बोरा ( रा. यशोदीप सोसायटी, गोकुळनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी एका २७ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, बोरा हा उच्चशिक्षित असून परदेशात नोकरी करतो. त्याचा तक्रारदार तरुणीबरोबर विवाह ठरला होता. त्यांचा साखरपुडाही झाली होता. मात्र काही कारणामुळे हा विवाह मोडला. बोरा हा परदेशातून विवाहासाठी पुण्यात रहात्या घरी आला होता. विवाह मोडल्याचा राग त्याच्या मनात खदखदत होता. यातूनच त्याने जी मेल, फेसबुक, इंन्स्टाग्राम, प्रिन्टरेस्ट आदी सोशल नेटवर्किंग साइट्सवरून बनावट नावाने खाती उघडून तरुणीच्या मित्र व नातेवाईकांना त्रास देण्यास सुरूवात केली.
दरम्यान, हा प्रकार तक्रारदार यांना समजताच त्यांनी, पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर आदेशला अटक करुन कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्याची जामिनावर सुटका केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times