वॉशिंग्टन: अॅरिझोना आणि विस्कॉन्सिन या दोन राज्यांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उ‌मेदवार जो बायडन यांना अधिकृतरित्या विजयी घोषित करण्यात आले आहे. डोनाल्ड ट्रम्प २०१६च्या निवडणुकीत या दोन्ही राज्यांमध्ये विजयी झाले होते. विस्कॉन्सिनमध्ये बायडन यांनी २० हजार ७०० मतांनी विजय मिळवला, तर अॅरिझोनामध्ये ते १० हजारांपेक्षा अधिक मतांनी विजयी झाले आहेत.

विद्यमान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी निवडणुकीचा निकाल अद्याप मान्य केलेला नाही. मतदानात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. अॅरिझोनामध्ये ११ इलेक्टोरल कॉलेज मते आहेत. बायडन यांच्याकडे आता ३०६ इलेक्टोरल मते झाली आहेत, तर ट्रम्प यांच्याकडे २३२ इलेक्टोरल मते आहेत. दरम्यान, ट्रम्प यांनी या प्रक्रियेवर टीका केली असून, ‘हा संपूर्ण भ्रष्टाचार आहे. आपल्या देशासाठी हे किती दु:खद आहे,’ असे ट्विट केले आहे. ‘मी स्वत:साठी लढत नसून, मला मतदान केलेल्या ७ कोटी ४० लाख लोकांच्या वतीने लढत आहे,’ असे ट्रम्प यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

वाचा:

वाचा: डॉ. अॅटलास यांचा राजीनामा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे करोना विषयावरील वादग्रस्त विशेष सल्लागार डॉ. स्कॉट अॅटलास यांनी पदाचा राजीनामा दिला. सार्वजनिक आरोग्य; तसेच साथरोग नियंत्रणाचा कोणताही अनुभव नसलेल्या डॉ. अॅटलास यांनी चार महिन्यांच्या काळात या पदावर असताना वादग्रस्त भूमिका घेतल्या. मास्कच्या वापराबद्दल त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. लॉकडाउनच्या संकल्पनेला विरोध करून, त्यांनी ‘हार्ड इम्युनिटी’च्या तत्त्वाचा पुरस्कार केला होता.

वाचा:

वाचा:

बायडन-गुटेरस यांची चर्चा

अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जो बायडन आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी चर्चा केली. अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांतील सहकार्य मजबूत करण्याबाबत दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. याशिवाय कोव्हिड-१९ साथ, हवामान बदल आणि शांतता आणि सुरक्षा याबद्दलही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here