नवी दिल्ली: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी तीन केंद्रीय कृषी कायद्यांविरोधातील () शेतकऱ्यांच्या आदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवर (Central Government) निशाणा साधला. सरकारने आता चर्चेद्वारे फसवणूक करणे थांबवून ही काळे कायदे रद्द करावेत असे राहुल गांदी यांनी सरकारवर टीकास्त्र सोडताना म्हटले आहे. देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न अर्धे झाले, मात्र सरकारच्या मित्रांचे उत्पन्न चौपट झाल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी सरकारवर केला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले की, ‘मोदी सरकार, शेतकऱ्यांना आश्वासने देणे बंद करावे, बेईमान-अत्याचार बंद करावे, चर्चेचे गुन्हाळे बंद करावेत, शेतकरी, कामगारविरोधी तीन काळे कायदे रद्द करावे.’ ( criticizes modi government twitting on farmers protest)

‘यह झूठ की, लूट की, सूट-बूट की सरकार है’

राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनाशी संबंधित एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत राहुल गांधी म्हणतात, ‘शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल असे सांगितले गेले होते. मात्र मित्रांचे उत्पन्न चौपट झाले आणि शेतकऱ्यांचे उत्तन्न झाले अर्धे.’ राहुल गांधी यांनी सरकारवर आरोप करत म्हटले, की ‘यह झूठ की, लूट की, सूट-बूट की सरकार है.’

क्लिक करा आणि वाचा-

दरम्यान, नव्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या ३५ शेतकरी संघटनांच्या मागण्यांचा विचार करण्यासाठी एक समिती गठित करण्याचा सरकारचा प्रस्ताव मंगळवारी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी फेटाळून लावला. सरकारचे वरिष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत मंगळवारी झालेली बैठक निष्फळ ठरली. तीन रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी मोठ्या संख्येने दिल्लीजवळ गेल्या आठवडाभरापासून आंदोलन करत आहेत.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here