मुंबई: शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अभिनेत्री आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी लगेचच कामाचा धडाका सुरू केल्याचेही पाहायला मिळत असून या धामधूमीत त्यांनी केलेले एक ट्वीट सर्वात लक्ष्यवेधी ठरले आहे. ( Latest News Updates )

वाचा:

उर्मिला मातोंडकर यांच्या प्रवेशावर टीका होऊ लागली आहे. उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना केलेली वक्तव्ये, लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेनेच्या मुंबई पालिकेतील कारभारावर केलेली टीका, याचे व्हिडिओ विरोधकांकडून व्हायरल करण्यात येत आहेत. त्यात भाजपचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते यांनीही शिवसेनेवर निशाणा साधला आहे. उर्मिला यांना पक्षात घेऊन शिवसेनेने पक्षातील लढवय्या महिला कार्यकर्त्यांचंच अवमूल्यन केलं आहे, अशी तोफ दरेकर यांनी डागली आहे. दुसरीकडे उर्मिला यांना सोशल मीडियातही ट्रोल करण्यात येत आहे. या सर्वावर उर्मिला यांनी शिवसेनेच्या स्टाइलमध्येच प्रत्युत्तर दिले आहे.

वाचा:

उर्मिला यांनी अत्यंत मोजक्या शब्दांत ‘झणझणीत’ ट्वीट केलं आहे. ‘तुमको मिर्ची लगीं तो मैं क्या करूँ’, हे गाणे मला खूप आवडते. तुम्हाला काय वाटते?’, असे ट्वीट करत उर्मिला यांनी विरोधक आणि ट्रोलर्सचा खरमरीत समाचार घेतला आहे. उर्मिला यांचं हे ट्वीट सध्या चर्चेचा विषय बनलं आहे.

दरम्यान, उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ‘मी एक शिवसैनिक म्हणून काम करणार’ असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार त्यांनी कामाचा धडाकाही सुरू केला आहे. उर्मिला आज शिवसेना भवन येथे आल्या होत्या. तिथे त्यांनी शिवसैनिकांसोबत संवाद साधला. उर्मिला यांची राज्यपाल नियुक्त सदस्यपदासाठी शिवसेनेकडून शिफारस करण्यात आली आहे. राज्यपालांकडे जी १२ नावे पाठवली आहेत त्यात उर्मिला यांचेही नाव आहे. या यादीला राज्यपालांची मान्यता मिळाल्यास उर्मिला यांना विधानपरिषदेत काम करण्याची संधी मिळणार आहे. दुसरीकडे शिवसेनेने उर्मिला यांना पक्षाची दारे उघडून भाजपला शह दिल्याचेही बोलले जात आहे. अभिनेत्री कंगना राणावत ही शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरली आहे. शिवसेना नेतृत्वाला कंगना सातत्याने लक्ष्य करत आहे. त्याला तोडीस तोड उत्तर देण्याची जबाबदारी आता उर्मिला या निभावणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. उर्मिला यांनी शिवसेनेत नसतानाही कंगनाचा समाचार घेतला होता आणि आता शिवसैनिक म्हणून त्या कंगनाला भिडतील, असेच दिसत आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here