वाचा:
प्रशासनाच्या वतीने पंढरपूर नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांनी शहर पोलिसांत तक्रार केली होती. त्याआधारे जय सिद्धेश्वर स्वामी यांच्याविरुद्ध आचारसंहितेच्या भंग प्रकरणी भादंवि १७१ फ व १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस उपअधीक्षक विक्रम कदम यांनी सांगितले.
मंगळवारी मतदान प्रक्रिया सुरू असताना पंढरपूर शहरातील द. ह. कवठेकर प्रशाला येथे असलेल्या मतदान केंद्र क्रमांक १८९ मध्ये दुपारी भाजप खासदार जय सिद्धेश्वर स्वामी आले होते. याला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संदीप मांडवे यांनी आक्षेप घेत तक्रार केली होती. यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि नंतर खासदार स्वामी यांचेवर आचारसंहिता भंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाचा:
दरम्यान, पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात सोलापूर जिल्ह्याचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी काल मतदान पार पडले. यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडलेला नसला तरी काही ठिकाणी खटके मात्र उडाले होते. त्यात जय सिद्धेश्वर स्वामी यांच्या मतदान केंद्रातील वावरावर काँग्रेसकडून आक्षेप घेण्यात आला होता. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीने घेतली होती. ही मागणी व उपलब्ध पुरावे यांच्या आधारावर प्रशासनाला तक्रार करावी लागली. या तक्रारीनुसारच गुन्हा दाखल झाला आहे. दुसरीकडे पदवीधरच्या तीन, शिक्षकच्या दोन आणि अन्य एक अशा सहा जागांवरील मतमोजणी उद्या होणार असून या सहा जागांच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times