वाचा:
करोना संसर्गावर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणा अहोरात्र परिश्रम घेताना दिसत आहे. गेल्या आठ महिन्यांपासून ही लढाई सुरू आहे. त्यातून राज्यात करोनाचा उद्रेक थांबवण्यात यश मिळाले असले तरी करोनावर अद्याप पूर्णपणे नियंत्रण मिळवता आलेले नाही. करोनावरील लस आल्यानंतरच हे संपूर्ण नियंत्रण शक्य होणार आहे. तोवर उपलब्ध उपचारपद्धती व शासनाने घालून दिलेले नियम यांचा आधार घेतच करोनापासून बचाव करावा लागणार आहे. महाराष्ट्राचा विचार केल्यास करोनाचे आकडे सातत्याने वेगवेगळे रंग दाखवत आहेत. संपल्यानंतर करोनाचे आकडे वेगाने वाढताना दिसत होते. त्यात गेल्या काही दिवसांपासून घट पाहायला मिळाली. त्यानंतर आज पुन्हा एकदा दैनंदिन बाधित रुग्णांचा आकडा वाढल्याचे दिसत आहे. त्याचवेळी मृतांची संख्याही वाढली आहे.
वाचा:
राज्यात आज १११ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून एकूण मृतांचा आकडा ४७ हजार ३५७ इतका झाला आहे. राज्यातील सध्या २.५८ टक्के इतका आहे. आज राज्यात ५ हजार ६०० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर ५ हजार २७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण १६ लाख ९५ हजार २०८ करोना बाधित रुग्णांनी या आजारावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण () आता ९२.५२ टक्के इतके झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ९ लाख ८९ हजार ४९६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८ लाख ३२ हजार १७६ (१६.६७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ४७ हजार ७९१ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर ६ हजार ७३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times