म.टा. प्रतिनिधी, औरंगाबाद: अंमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणात असलेल्या आरोपीची जामीनीवर झालेल्या सुटकेनंतर टाऊन हॉल ते आसेफिया कॉलनीच्या दरम्यान आरोपीची मिरवणूक काढण्यात आली. या आरोपीचे ठिकठिकाणी स्वागतही करण्यात आले. हार तुरे सह सलाम भाई करून आरोपीला त्याच्या घरापर्यंत नेण्यात आले. मिरवणूकीत स्वागत स्विकारणाऱ्या आरोपीचे नाव अकबर अली रा. आसेफिया कॉलनी असे आहे.

या प्रकरणात स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाने अंमली पदार्थांची तस्करी करण्याच्या प्रकरणात कारवाई केली होती. दोन महिन्यापुर्वी तीन आरोपींना अटकही करण्यात आली होती. या आरोपींच्या विरोधात वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणातील आरोपीला नियमित जामीन अर्जावरून जामीन मंगळवारी (१ डिसेंबर) देण्यात आला. हा जामीन मंजूर झाल्यानंतर टाऊन हॉल भागात आलेल्या या आरोपीचे मंगळवारी स्वागत फटाके फोडून करण्यात आले. तसेच २० ते २५ युवकांनीही घोषणा बाजी केली. कोन आया शेर आया असे सांगत या आरेापीचे स्वागत केले.
या स्वागत मिरवणूकीमुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडीही काही प्रमाणात झाली होती. या प्रकरणाची माहिती बेगमपुरा पोलिसांना झाल्यानंतर त्यांनी काही आरोपी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई

प्रकरणातील आरोपीच्या स्वागत मिरवणुकीचा व्हिडीओ बुधवारी सोशल मिडीयावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ व्हायरल होताच बेगमपुरा पोलिसांनी बुधवारी मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या आरोपीसह अन्य युवकांवर बेगमपुरा पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here