जॉन्सन भारतात येण्यास खूप उत्सुक असल्याचं ब्रिटनने म्हटलं आहे. यापूर्वी १९९३ मध्ये ब्रिटनचे पंतप्रधान जॉन मेजर हे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सहभागी झाले होते.
उभय देशाच्या नेत्यांनी करोना व्हायरस, लशीची तयारी आणि उत्पादनाविषयी चर्चा केली होती. करोना, संरक्षण करार, व्यापार यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांनी करोना आणि ब्रेग्झिटनंतरच्या काळात भारत-ब्रिटनधील भागीदारी बळकट करण्यावर आपली कटिबद्धता व्यक्त केली. व्यापार, गुंतवणूक, वैज्ञानिक संशोधन, विद्यार्थी व व्यावसायिकांची देवाणघेवाण आणि संरक्षण, सुरक्षा क्षेत्रातील सहकार्य यात अनेक संधी असल्याचं दोन्ही नेत्यांनी मान्य केलं.
ब्रिटनमध्ये करोना लसीला मंजुरी
करोना व्हायरसविरोधी लढाईबाबत ब्रिटनने मोठी घोषणा केली आहे. ब्रिटनने फायजर आणि बायोएन्टेकच्या लसीला मंजुरी दिली आहे. यानुसार करोनाची लस पुढील आठवड्यापासून सर्वसामान्यांना उपलब्ध होईल.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times