रत्नागिरी । सुनील नलावडे

अंडरवर्ल्ड डॉन आणि भारताचा मोस्ट वॉण्टेड गुन्हेगार दाऊद इब्राहिमच्या आणखी एका संपत्तीचा मंगळवारी लिलाव करण्यात आला आहे. रत्नागिरीतील खेड तालुक्यातील येथील दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव झाला आहे. लोटे गावातील स्थानिक ग्रामस्थ यांनी सर्वाधिक बोली लावून ही जमीन खरेदी केली आहे. रवींद्र काते यांनी १ कोटी १० लाख इतक्या किमतीला ही मालमत्ता मिळवली. (SAFEMA) अंतर्गत हा ऑनलाइन लिलाव झाला. ( )

वाचा:

केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच लोटे येथील या जागेची पाहणी केली होती. त्यावेळी या जागेची किंमत ६१ लाख ४८ हजार १०० रुपये निश्चित करण्यात आली होती. दरम्यान, १० नोव्हेंबर रोजी झालेल्या लिलाव प्रक्रियेत दाऊदच्या ७ पैकी ६ जागांचा लिलाव झाला होता मात्र, लोटे येथे असलेल्या १५०, १५१, १५२, १५३ व १५५ या क्रमांकाच्या भूखंडाचा लिलाव काही कारणास्तव करण्यात आला नव्हता. या मालमत्तेचा लिलाव आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आला. या प्रक्रियेत दिल्ली येथील वकील आणि खेड तालुक्यातील घाणेखुंट गावचे रहिवाशी रवींद्र काते या दोघांनीच बोली लावली. काते यांनी या भूखंडासाठी १ कोटी १० लाखांची बोली लावल्यानंतर त्यापेक्षा मोठी बोली कुणीही न लावल्याने काते यांच्या पदरात ही मालमत्ता पडली.

वाचा:

दरम्यान, यापूर्वी दिल्लीच्या दोन वकिलांनी दाऊदच्या सहा मालमत्ता लिलावात विकत घेतल्या होत्या. या लिलावातून सरकारला २२ लाख ७९ हजार ६०० रुपये मिळाले आहेत. वकील अजय श्रीवास्तव यांनी दाऊदच्या दोन मालमत्ता तर वकील भूपेंद्र भारद्वाज यांनी चार मालमत्ता घेतल्या होत्या. दाऊदची रत्नागिरीतील हवेली अवघ्या ११ लाख २० हजार रुपयांना विकण्यात आली होती. स्मगलर्स अँड फॉरेन एक्स्चेंज मॅनिप्युलेटर्स कायद्याखाली ही प्रक्रिया झाली होती.

दाऊदच्या १७ मालमत्तांचा आतापर्यंत

कासकरचे मूळ गाव हे खेड तालुक्यातील मुंबके हे आहे. या गावात त्याचा बंगला व आंब्याची बाग तर लोटे आणि खेड शहर अशा सहा ठिकाणी त्याच्या वेगवेगळ्या मालमत्ता होत्या. केंद्र सरकारने या मालमत्ता ताब्यात घेऊन त्या मालमत्तेचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला. ‘साफेमा’ अंतर्गत दाऊदच्या एकूण १७ मालमत्तांचा लिलाव करण्यात आला आहे.

वाचा:

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here