म. टा. प्रतिनिधी, पुणेः आधारकार्ड नव्याने काढणे किंवा आधारकार्डमध्ये दुरुस्ती करायची ( ) असल्यास घराजवळ कोणत्या ठिकाणी आधार केंद्र आहे ( ) आणि कोणते केंद्र सुरू आहे, याची माहिती आता नागरिकांना टोल फ्री क्रमांकावरून घरबसल्या मिळणार आहे. त्यामुळे आधार केंद्र शोधण्याच्या त्रासातून नागरिकांची सुटका होणार आहे.

या सुविधेसाठी युनिट आयडेंटिफिकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) टोल फ्री क्रमांक जाहीर केला आहे. १९४७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर नागरिकांना आधार केंद्र कोठे आहे, कोणते केंद्र सुरू आहे, संबंधित केंद्राचा पत्ता आदी माहिती मिळू शकणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलं.

दरम्यान, यूआयडीएआयने आधारविषयक कामे करण्यासाठी पूर्वनियोजित वेळ नोंदविण्याची सुविधा यापूर्वीच उपलब्ध करून दिली आहे.

आधारची कामे आणि शुल्क

– आधारकार्डची नव्याने नोंदणी ही नि:शुल्क आहे

– आधारकार्डवरील पत्ता, मोबाइल क्रमांक, छायाचित्र, लिंग आणि जन्मतारीख यांमध्ये बदल करण्यासाठी ५० रुपये

– बोटांचे ठसे, डोळ्यांचे स्कॅन करणे अशा बायोमेट्रिक कामांसाठी १०० रुपये

– केंद्र चालकाने अधिक रकमेची मागणी केल्यास १९४७ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करता येणार

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here