जललयुक्त शिवार योजनेतून राज्यात झालेल्या कामांबाबत कॅगने ताशेरे ओढल्यानंतर चौकशी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला होता. सांगली जिल्ह्यात २०१८-१९ मध्ये आठ तालुक्यातील ४०३ गावांमध्ये राबविण्यात आली. सन २०१५-१६ मध्ये १४१ गावांची निवड करण्यात आली. या गावांमध्ये ४ हजार ७२९ कामे पूर्ण झाली आहेत. २०१७-१८ या वर्षात १४० गावांमध्ये ७ हजार ९५१ कामांपैकी ७ हजार ८३४ कामे पूर्ण झाली आहेत.
यातील अनेक कामांबद्दल स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आहेत. बोगस काम झाल्याचे आरोप केले जातात. जत तालुक्यात झालेल्या कामांच्या फाईल्स घेऊन अधिकारी मुंबईला रवाना झाले आहेत. गुरुवारी मंत्रालयात वरिष्ठ अधिकां-यांना कामांची माहिती दिली जाणार आहे. जिल्ह्यातील जलयुक्त शिवारच्या सर्वच कामांची चौकशी होणार असल्याने अधिकार्यांत खळबळ उडाली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times