२८ नोव्हेंबरला कुर्ला स्थानकातील पादचारी पुलावर ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, फय्याज नेनपुरवाला असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या तरुणाची हत्या करण्याच्या किंवा त्याला गंभीर जखमी करण्याच्या उद्देशानेच हा हल्ला झाला असावा. कारण हल्लेखोराने त्याच्याकडील पैसे लुटण्याचा प्रयत्न केला नसल्याचे व्हिडिओत दिसते.
कुर्ला पूर्वेकडील आपल्या मित्राला भेटून आल्यानंतर फय्याज रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावरून पलीकडे जात होता. त्यावेळी त्याच्यावर अचानक हल्ला झाला. हल्लेखोराचा चेहरा कपड्याने झाकलेला होता. त्याने फय्याजच्या पोटावर चाकूने वार केले. त्यानंतर तो तेथून पसार झाला. हल्ला झाला तेव्हा पुलावरून इतर प्रवासी ये-जा करत होते. त्यातील काहींनी फय्याजला रुग्णालयात दाखल केले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times