नवी दिल्ली: केंद्रीय कृषी कायद्यांच्या (Farm Laws) विरोधात देशात शेतकऱ्यांचे आंदोलन आता अधिक उग्र स्वरुप धारण करत आहे. या दरम्यान पंजाबचे माजी मुख्यमंत्री () यांनी या कायद्यांच्या निषेधार्थ आपला () हा सन्मान परत केला आहे. बादल यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना तीनपानी पत्र लिहून केंद्रीय कृषी कायद्यांचा निषेध केला आणि शेतकऱ्यांवर करण्यात येत असलेल्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त करत पद्मविभूषण परत केला.

आपला पद्मविभूषण सन्मान परत करताना पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल म्हणाले, ‘मी इतका गरीब आहे की, शेतकऱ्यांसाठी अर्पण करण्याला माझ्याकडे काहीच नाही. मी जो काही आहे तो शेतकऱ्यांमुळेच आहे. अशात जर शेतकऱ्यांचा अपमान होत असेल, तर कोणत्याही प्रकारचा सन्मान राखून ठेवण्यात काहीच फायदा नाही.’

शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली असून, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे दु:ख झाले आहे. शेतकऱ्यांच्या आदोलनाला ज्या प्रकारे चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात येत आहे ते अतिशय दु:खद असल्याचे बादल यांनी म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा-

हरसिमरत कौर बादल यांनीही दिला होता केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा

या पूर्वी देखील बादल कुटुंबाद्वारे केंद्रीय कृषी कायद्यांचा मोठा विरोध झालेला होता. हरसिमरत कौर बादल यांनी देखील आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. केंद्रीय कृषी कायदे हे शेतकऱ्यांची करण्यात येत असलेली फसवणूक असल्याचे त्यांनी म्हटले होते. इतकेच नाही तर, सुखबीर बादल यांनी अकाली दलाला एनडीएपासून वेगळे करण्याची घोषणा करत पंजाबच्या निवडणुका एकट्याने लढवण्याचा निर्णय जाहीर केला होता.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here