धुळे-नंदूरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपच्या अमरीश पटेल यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. पटेल यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांचा २३४ मतांनी पराभव केला आहे. महाविकास आघाडीकडे २१३ मतं असताना पाटील यांना केवळ ९८ मते मिळाली. आघाडीच्या लोकप्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात ‘क्रॉस वोटिंग’ केल्याचं यातून स्पष्ट झालं आहे. दरेकर यांनी निकालावर प्रतिक्रिया देताना महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
वाचा:
‘महाविकास आघाडीमध्ये सगळं काही आलबेल आहे, असं त्यांचे नेते वारंवार सांगतात. मात्र, ही आघाडी विसवंदांनी व मतभेदांनी भरलीय. हा त्याचा स्फोट मतदारसंघात झालाय. उर्वरित निकालातही तो दिसेल,’ असं दरेकर म्हणाले.
वाचा:
‘महाविकास आघाडीकडे २१३ एकत्रित मतं होती. काँग्रेसकडं १५७ मतं होती. शिवसेनेकडे २० होती. राष्ट्रवादीकडे ३६ मतं होती. असं असताना आघाडीच्या उमेदवाराला केवळ ९८ मतं मिळाली. याचा अर्थ काय?,’ असा प्रश्न दरेकर यांनी केला. ‘काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनीही आपल्या उमेदवाराला मतदान केलं नाही. आघाडीतील इतर लोकप्रतिनिधी देखील महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या मागे ठामपणे राहिले नाहीत. त्यांनी अमरीश पटेल यांना मतदान केलं. आम्ही आघाडीचा आदेश मानत नाही हेच त्यांनी दाखवून दिलंय. उद्याच्या राजकारणाची दिशा काय असेल? महाविकास आघाडीचं भविष्य काय असेल हे सांगणारा हा निकाल आहे आणि ही सुरुवात आहे,’ असं दरेकर यांनी सांगितलं.
वाचा:
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times