अजमेरला जाणाऱ्या भाविकांसाठी हैदराबाद-जयपूर विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस ५ डिसेंबरपासून, तर दक्षिण भारतातील भाविकांचा शिर्डीकडील ओढा लक्षात घेता द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस शिर्डी-सिकंदराबाद-शिर्डी व काकिनाडा-शिर्डी या तीन विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. तसेच अमरावती-तिरुपती या विशेष गाडीला मुदतवाढ देण्यात आली आहे. तिच्या वेळेत मत्र बदल करण्यात आला आहे. हैदराबाद-जयपूर ही साप्ताहिक विशेष गाडी औरंगाबाद मार्गे शनिवारपासून (५ डिसेंबर) दर शनिवारी हैदराबाद रेल्वेस्थानकावरून दुपारी ३.१० वाजता सुटेल आणि नांदेड, परभणी, औरंगाबाद, मनमाडमार्गे जयपूर येथे सकाळी ५.२५ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात जयपूर-हैदराबाद साप्ताहिक विशेष गाडी औरंगाबाद मार्गे ८ डिसेंबरपासून दर मंगळवारी जयपूर रेल्वे स्थानकावरून दुपारी ३.२० वाजता सुटेल. मनमाड, औरंगाबाद, नांदेड मार्गे हैदराबादला सकाळी ७.३० वाजता पोहोचेल.
वाचा:
तिरुपती-अमरावती द्विसाप्ताहिक उत्सव विशेष गाडी तिरुपती येथून दर मंगळवारी व शनिवारी सुटेल. या गाडीला २९ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही गाडी बदललेल्या वेळेप्रमाणे तिरुपती येथून दुपारी ३.४० वाजता सुटेल व काचीगुडा येथे पहाटे ४ वाजता पोहोचेल. निझामाबादला सकाळी ६.५० वाजता, नांदेडला ८.५१ वाजता पूर्णा येथे ९.४०, अकोल्याला दुपारी १.४५ वाजता व अमरावती येथे दुपारी ३.१० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात अमरावती ते तिरुपती द्विसाप्ताहिक उत्सव विशेष गाडी अमरावतीहून दर सोमवारी व गुरुवारी सुटेल.
शिर्डीसाठी तीन रेल्वे गाड्या
सिकंदराबाद- श्री साईनगर द्विसाप्ताहिक विशेष गाडी ४ डिसेंबरपासून सिकंदराबादहून दर शुक्रवार, रविवारी दुपारी ४.४५ वाजता सुटेल. विकाराबाद, उदगीर, परळी, परभणी, औरंगाबाद, नगरसोल मार्गे शिर्डीला सकाळी ९.१० वाजता पोहोचेल. शिर्डी-सिकंदराबाद ही विशेष गाडी ५ डिसेंबरला शिर्डीहून दर शनिवारी व सोमवारी सायंकाळी ५.२० वाजता सुटेल. औरंगाबाद, परभणी, परळी, उदगीर मार्गे सिकंदराबादला सकाळी ८.५५ वाजता पोहोचेल.
काकिनाडा- शिर्डीही विशेष रेल्वे काकिनाडाहून ५ डिसेंबरपासून दर सोमवारी बुधवार, शनिवारी सकाळी ६ वाजता सुटेल. राजमुंद्री, विजयवाडा, सिकंदराबाद, विकाराबाद, परळी, परभणी, औरंगाबादमार्गे शिर्डीला सकाळी ०९.१० वाजता पोहोचेल.
परतीच्या प्रवासात शिर्डी-काकिनाडा ही विशेष गाडी शिर्डीहून ६ डिसेंबरपासून दर मंगळवार, गुरुवारी आणि रविवारी सायंकाळी ५.२० वाजता सुटेल. ती औरंगाबाद, परभणी, सिकंदराबाद, विजयवाडा मार्गे काकिनाडा येथे रात्री ७.४५ वा. पोहोचणार आहे.
रेल्वेच्या या निर्णयाचे ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनयझेशनचे जिल्हा संघटक शफीक बागवान, अहमद रंगरेज, शफीक आतार, जाफरभाई आतार, साजिद मणियार, रशिदभाई रंगरेज यांनी स्वागत केले आहे.
वाचा: वाचा:
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times