वॉशिंग्टन: अमेरिकेत करोनाच्या संसर्गाचे थैमान सुरू आहे. जवळपास एक कोटीहून अधिकजणांना करोनाची लागण झाली आहे. तर, अडीच लाखांहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. येत्या काही दिवसांत अमेरिकेत लस देण्यास सुरुवात होणार असल्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे अमेरिकेच्या तीन माजी राष्ट्राध्यक्षांनी एकत्रितपणे टीव्हीवर येत लस घेण्याची तयारी दर्शवली आहे.

अमेरिकेत करोनाचा हाहाकार सुरू असला तरी लोकांच्या मनात लशीच्या प्रभावाबाबत साशंकता आहे. त्यामुळेच लोकांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी बराक ओबामा, जॉर्ज बुश आणि बिल क्लिंटन यांनी एकत्रितपणे लस टोचून घेण्यासाठी तत्परता दाखवली आहे. बुधवारी एका मुलाखतीत माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सांगितले की, अमेरिकेचे संसर्गरोग तज्ज्ञ अँथोनी फॉसी यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळेच मी लस घेण्यासाठी जाणार असल्याचे ओबामा यांनी सांगितले. लाइव्ह टीव्हीवर लस टोचून घेण्यास मी तयार असल्याचे त्यांनी सांगितले. बराक ओबामा यांनी सांगितले की, अनेक नागरिकांच्या मनात लशीबाबत संशय आहे. लशीमुळे फारसा परिणाम होणार नाही, असेही त्यांना वाटत आहे. ही भीती दूर, संशय दूर करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

वाचा:

माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांचे चीफ ऑफ स्टाफ फ्रेडी फोर्ड यांनी सांगितले की, बुश यांनी फॉसी आणि त्यांच्या टीमसोबत चर्चा केली आहे. लस सुरक्षित असल्याचे लोकांना पटवून द्यावे लागणार असून प्राथमिकतेनुसार लोकांना लस द्यावी असे बुश यांनी म्हटले. लस टोचून घेण्यासाठी स्वत: रांगेत उभे राहून लस घेण्याची तयारी बुश यांनी दर्शवली आहे.

वाचा:

तर, माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनीदेखील सार्वजनिकरीत्या लस टोचून घेण्याची तयारी दर्शवली आहे. आरोग्य विभागाने निश्चित केलेल्या प्राथमिकतेनुसार बिल क्लिंटन लस घेणार असल्याचे त्यांच्यावतीने सांगण्यात आले. लोकांमध्ये लशीबाबत विश्वास निर्माण करण्यासाठी सार्वजनिकपणे लस घेण्यासही क्लिंटन तयार असल्याचे त्यांच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.

वाचा:

नोव्हेंबर महिन्यात करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार अमेरिकन नागरिकांच्या मनात लस टोचून घेण्याबाबत भीती असल्याचे आढळून आले होते. जवळपास ४० टक्के अमेरिकन नागरिकांनी घेणार नसल्याचे म्हटले होते. लशीमुळे शरीरावर दुष्परिणाम होण्याची भीती नागरिकांनी सर्वेक्षणात व्यक्त केली होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here