गावस्करांनी याबाबत सांगितले की, ” भारताला जर पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात विजय मिळवायचा असेल तर त्यांची संघ निवड योग्य असायला हवी. माझ्यामते पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात फिरकीपटू कुलदीप यादवला खेळवायला हवे. कारण आतापर्यंत कुलदीपने चांगली गोलंदाजी केली आहे. त्याचबरोबर तो चांगल्या फॉर्मातही आहे. त्यामुळे भारतीय संघाने पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात नक्कीच कुलदीपला संधी द्यायला हवी, असे मला वाटते.”
कुलदीपला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात संधी देण्यात आली होती. या सामन्यात कुलदीपने ५७ धावा देत एक बळीही मिळवला होता. पहिल्या दोन वनडे सामन्यांमध्ये युजवेंद्र चहलची चांगलीच धुलाई झाली होती. पहिल्या सामन्यात चहलने सर्वाधिक ८९ धावा दिल्या होत्या, तर दुसऱ्या वनडेमध्ये चहलने ७१ धावा दिल्या होत्या. दोन्ही सामन्यांमध्ये महागडी गोलंदाजी केल्यानंतर चहलला तिसऱ्या वनडे सामन्यामध्ये संघातून डच्चू देण्यात आला होता. त्यामुळेच तिसऱ्या वनडेमध्ये कुलदीपला संधी मिळाली होती. कुलदीपने या सामन्याच चहलपेक्षा फार कमी धावा दिल्या होत्या. त्यामुळे पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात नक्कीच कुलदीपला संघी मिळायला हवी, असे चाहत्यांनाही वाटत आहे.
हार्दिक पंड्याने गोलंदाजी करावी की नाही…पाठीच्या दुखापतीमुळे हार्दिक गेले वर्षभर गोलंदाजी करत नव्हता. पण दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात हार्दिकने गोलंदाजी केली होती आणि महत्वपूर्ण स्टीव्हन स्मिथचा बळीही मिळवला होता. हार्दिक पंड्याने गोलंदाजी करावी की नाही, याबाबत गावस्कर म्हणाले की, ” माझ्यमते हार्दिक पंड्याने गोलंदाजी करायला हवी. हार्दिकने २-३ षटके तरी टाकायला हवीत, असे मला वाटते. कारण ही गोष्ट कर्णधार विराट कोहली आणि भारतीय संघासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकते.”
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times