मुंबई: मुंबईत ” सुरू करण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. त्यानंतर लगेचच पुण्यासह इतर शहरांतही ‘नाइट लाइफ’ची चर्चा सुरू झाली. याबाबत पर्यावरणमंत्री यांना विचारलं असता, ‘पुण्यात आधी ‘आफ्टरनून लाइफ’ सुरू करायला हवं,’ अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली. त्यांच्या ‘ठाकरे स्टाइल’ कोपरखळीची सध्या जोरदार चर्चा आहे.

आदित्य ठाकरे यांनी सर्वप्रथम ‘नाइट लाइफ’ची संकल्पना मांडली होती. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची गरज व रोजगार निर्मितीची क्षमता लक्षात घेऊन आदित्य यांनी याबाबत आग्रह धरला होता. अखेर ही संकल्पना प्रत्यक्षात आली आहे. खुद्द आदित्य ठाकरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत मीडियाला याची माहिती दिली. त्यावेळी पुण्याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर क्षणाचाही विलंब न करता त्यांनी मार्मिक उत्तर दिलं.

वाचा:

वाचा:

पुणं तिथं काय उणं… असं म्हटलं जातं. पुणे आणि पुणेकरांच्या स्वभाव वैशिष्ट्यांमुळं ही म्हण महाराष्ट्रभर प्रचलित आहे. पुण्यातील दुकानं व घराबाहेर असलेल्या पाट्या हे त्यातील एक वैशिष्ट्य आहे. पुणेरी पाट्यानंतर सर्वाधिक चर्चिली जाणारी तिथली एक गोष्ट म्हणजे दुपारची झोप. दुपारची वेळ पुणेकरांची विश्रांतीची वेळ असते. त्या वेळेत अनेकदा दुकानं बंद असतात. अलीकडं परिस्थिती बदलली असली तरी त्यावरून आजही विनोद केले जातात. याच अनुषंगानं आदित्य यांनी ‘आफ्टरनून लाइफ’ची मार्मिक टिप्पणी केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये खसखस पिकली.

वाचा:

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here