कॅनबेरा, : भारतीय संघ सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियामध्ये खेळत आहे. पण एकाच दिवशी भारताचे दोन संघ ऑस्ट्रेलियात मैदानात उतरणार असल्याचे पाहायला मिळू शकते.

ऑस्ट्रेलियामध्ये ६ डिसेंबरला भारताचे दोन संघ एकाच दिवशी मैदानात उतरणार आहे. या दिवशी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये दुसरा ट्वेन्टी-२० सामना रंगणार आहे. त्याचबरोबर या दिवशीच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ‘अ’ संघांमध्ये तीन दिवसीय सामना सुरु होणार आहे. त्यामुळे एकाच दिवशी सिडनीमध्ये दोन भारतीय संघ मैदानात उतरणार आहेत. याबाबतची माहिती क्रिकइन्फो या संकेतस्थळाने दिली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या ‘अ’ संघाचे कर्णधारपद वेगवान गोलंदाज सीन अॅबॉटकडे असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या या संघात जॅक्सन बर्ड, अॅश्टॉन अगर आणि जो बर्न्ससारखे खेळाडू असतील. पण भारताच्या ‘अ’ संघाबाबत अजून कोणतीही माहिती प्रसारीत झालेली नाही. त्यामुळे भारताच्या ‘अ’ संघात नेमके कोणते खेळाडू असतील, याबाबत चाहत्यांना उत्सुकता नक्कीच असेल.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये उद्या पहिला ट्वेन्टी-२० सामना रंगणार आहे. भारताच्या ट्वेन्टी-२० संघात काही महत्वाचे बदल उद्याच्या सामन्यात होऊ शकतात, असे म्हटले जात आहे. कारण भारताने यापूर्वी ऑस्ट्रेलियात वनडे मालिका गमावली आहे. पण अखेरच्या वनडे सामन्यात भारताला विजय मिळवता आला होता. त्यामुळे भारतीय संघाचे मनोबल ट्वेन्टी-२० मालिका खेळण्यापूर्वी चांगलेच उंचावलेले असेल आणि त्याचा फायदा संघाला होऊ शकतो. त्याचबरोबर पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात काही बदल किंवा प्रयोग भारतीय संघात होऊ शकतात, असेही म्हटले जात आहे. त्यामुळे पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठी भारतीय संघाता कोणाला संधी मिळते आणि कोणाला डच्चू यांची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here