वाचा:
‘कंगनाची बहीण हिने समाजात दुही निर्माण करण्याचा, द्वेष निर्माण करण्याचा आणि सामाजिक सौहार्दता बिघडवण्याचा प्रयत्न करणारे ट्वीट केल्याने ट्वीटर कंपनीने काही महिन्यांपूर्वी रंगोलीचे ट्वीटर अकाऊंट बंद केले. मात्र, कंगनाकडूनही वारंवार असेच आक्षेपार्ह ट्वीट केले जात आहेत. वांद्रे न्यायदंडाधिकारी न्यायालयाने काही आक्षेपार्ह ट्वीटबद्दल एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिल्यानंतर वांद्र पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. त्यानंतरही एकप्रकारे न्यायव्यवस्थेची खिल्ली उडवत कंगनाने आक्षेपार्ह ट्वीट केले. अंधेरी न्यायदंडाधिकारी न्यायालयातही कंगनाच्या काही आक्षेपार्ह ट्वीट्सविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अलीकडेच शेतकऱ्यांविषयी अत्यंत आक्षेपार्ह ट्वीट केल्याबद्दल कर्नाटकमधील न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. अशी अनेक उदाहरणे असून सरकार किंवा समाजातील विविध घटकांचा अनादर करत कंगनाकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा अत्यंत गैरवापर सुरू आहे’, असे अॅड. देशमुख यांनी आपल्या याचिकेत निदर्शनास आणले आहे.
वाचा:
‘कंगनाच्या वारंवारच्या गैर व आक्षेपार्ह ट्विट्समुळे तिचे अकाऊंट स्थगित करण्याविषयीची विनंती ईमेलद्वारे मी पाठवली. मात्र, त्याची कंपनीने योग्य दखल घेतली नाही. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची गरज आहे’, असे म्हणणेही देशमुख यांनी मांडले आहे.
कंगनाने दिले उत्तर
हायकोर्टात दाखल झालेल्या याचिकेवर कंगनाने ट्वीटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘हा हा हा…अखंड भारतासाठी सातत्याने बोलत आहे. टुकडे टुकडे गँगसोबत मी लढत आहे. असे असताना देशात दुफळी निर्माण करण्याचा आरोप माझ्यावर लावण्यात आला आहे. वाह…क्या बात है…तसंही केवळ ट्वीटर हे माझ्यासाठी एकमेव माध्यम नाहीय. मी चुटकी वाजवताच माझी प्रतिक्रिया घेण्यासाठी हजारो कॅमेरे माझ्या पुढ्यात हसतमुखाने हजर होतील’, असं ट्वीट कंगनाने केलं आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times