कॅनबेरा, : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला ट्वेन्टी-२० सामना उद्या होणार आहे. भारताला ऑस्ट्रेलियामध्ये आतापर्यंत मोठी सलामी मिळालेली नाही. त्यामुळे या पहिल्या सामन्यात शिखर धवनबरोबर कोणत्या फलंदाजाने सलामीला यायला हवे, याचा सल्ला भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी दिला आहे.

गावस्कर यांनी याबाबत सांगितले की, ” खेळाडूंच्या फॉर्मचा विचार केला गेला तर शिखर धवनबरोबर लोकेश राहुलने सलामीला यायला हवे, असे मला वाटते. कारण या दोघांनीही आयपीएलमध्ये धडाकेबाज फलंदाजी केली होती. राहुलने किंग्स इलेव्हन पंजाबच्या संघाकडून खेळताना ६७० धावा केल्या होत्या, त्यचाबरोबर धवनने दिल्ली कॅपिटल्सच्या संघाकडून खेळताना ६१८ धावा केल्या होत्या. त्यामुळे माझ्यामते पहिल्या ट्वेनटी-२० सामन्यात धवन आणि राहुल यांनी सलामीला यायला हवे, असे मला वाटते.”

गावस्कर पुढे म्हणाले की, ” माझ्यामते धवन आणि राहुल हे ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये चांगली सलामी करू शकतात. या दोघांनंतर तिसऱ्या क्रमांकावर कर्णधार विराट कोहलीने यायला हवे. पण जर १४-१५ षटकांपर्यंत जर दुसरी विकेट पडली तर हार्दिक पंड्याला चौथ्या क्रमांकावर बढती देण्यात यावी. पण जर भारताच्या दोन विकेट्स पहिल्या सहा षटकांमध्ये पडल्या तर चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यरला संधी द्यायला हवी.”

पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात फिरकीपटू कुलदीप यादवला का संधी देण्यात यावी, याबाबत गावस्करांनी सांगितले की, ” भारताला जर पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात विजय मिळवायचा असेल तर त्यांची संघ निवड योग्य असायला हवी. माझ्यामते पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात फिरकीपटू कुलदीप यादवला खेळवायला हवे. कारण आतापर्यंत कुलदीपने चांगली गोलंदाजी केली आहे. त्याचबरोबर तो चांगल्या फॉर्मातही आहे. त्यामुळे भारतीय संघाने पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात नक्कीच कुलदीपला संधी द्यायला हवी, असे मला वाटते.”

कुलदीपला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात संधी देण्यात आली होती. या सामन्यात कुलदीपने ५७ धावा देत एक बळीही मिळवला होता. पहिल्या दोन वनडे सामन्यांमध्ये युजवेंद्र चहलची चांगलीच धुलाई झाली होती. पहिल्या सामन्यात चहलने सर्वाधिक ८९ धावा दिल्या होत्या, तर दुसऱ्या वनडेमध्ये चहलने ७१ धावा दिल्या होत्या. दोन्ही सामन्यांमध्ये महागडी गोलंदाजी केल्यानंतर चहलला तिसऱ्या वनडे सामन्यामध्ये संघातून डच्चू देण्यात आला होता. त्यामुळेच तिसऱ्या वनडेमध्ये कुलदीपला संधी मिळाली होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here