पलामूः झारखंड पोलिस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने नक्षलवादी संघटना झारखंड जनमुक्ती परिषद (JJMP) विरोधात शोध मोहीम राबवत छापा टाकला. यात मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. पण विशेष म्हणजे शस्त्रांसह त्या ठिकाणी सेक्स टॉइजही आढळून आली. संघटनेच्या सदस्यांनी या सेक्स टॉइजचा उपयोग मुलं आणि प्रौढांचं लैंगिक शोषण करण्यासाठी केला, असा संशय आहे.

पालामू पोलिस आणि सीआरपीएफच्या पथकाने लातेहार-पलामूच्या सीमेवर असलेल्या पनकी पोलिस ठाण्यांतर्गत सलामदीरी गावात गुरुवारी पहाटे छापा टाकला. झारखंडमधील बंदी घातलेल्या नक्षलवाद्यांच्या ठिकाणावरून पहिल्यांदाच सापडले आहेत. हे पाहून पोलिस आणि सुरक्षा अधिकारीही विचारात पडले आहेत. बंदी घातलेल्या या संघटनेकडून सेक्स टॉइजचा उपयोग कशासाठी केला? याबाबत पोलिसांना अद्याप कुठलीही माहिती मिळू शकलेली नाही.

पुरुष, महिला आणि मुलांवर लैंगिक शोषणासाठी ते या सेक्स टॉइजचा उपयोग करत होते की नाही? या दृष्टाने पोलिस आणि सुरक्षा दलानेही तपास सुरू केला आहे.

पोलिस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने जेजेएमपीच्या छुप्या ठिकाणावर छापा टाकला त्यावेळी गोळीबार सुरू झाला. भीषण चकमकीनंतर नक्षलवादी तिथून पळून गेले. यानंतर पोलिसांनी घटना स्थळावरून एके ५६ असॉल्ट रायफल, पिस्तूल आणि काही आधार कार्डही जप्त केली.

झारखंडमध्ये शस्त्रे आणि रोकडसह सेक्स टॉइज जप्त करण्यात आल्याची ही पहिलीच वेळ आहे. सेक्स टॉइजचा उपयोग कशासाठी व्हायचा? याचा तपास केला जात आहे. नक्षलवाद्यांनी कोणत्या उद्देशाने सेक्स टॉइजचा वापर केला याचा शोध लावला जात आहे, असं पलामूचे एसपी संजीव कुमार म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here