वाचा:
पदवीधर, शिक्षक व स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी १ डिसेंबरला निवडणूक झाली होती. या निवडणुकीचे जवळपास सर्व निकाल हाती आले असून त्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. यावरून आमदार रोहित पवार यांनी राज्यातील नेत्यांना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. ‘आता तरी भाजपने राज्यात विरोधी पक्ष म्हणून प्रामाणिकपणे काम करण्यास सुरुवात करायला हरकत नाही,’ असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
वाचा:
रोहित पवार यांनी म्हटलं आहे की, ‘भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असली तरी महाविकास आघाडीसाठी निष्ठेची होती. राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस व शिवसेनेसह सहयोगी पक्षांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी एकमेकांबद्दल दाखवलेली निष्ठाच आज कामी आली. या निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडीची मनातील जागा कायम ठेऊन भाजपला त्यांची ‘जागा’ दाखवून दिली. भाजपचे म्हणवल्या जाणाऱ्या नागपूर, पुण्यासारख्या बुरुजालाही सुरुंग लावत इथं महाविकास आघाडीने विजयाचा झेंडा रोवला. त्यामुळं आतातरी महाराष्ट्रातील भाजपने खऱ्या अर्थाने विरोधी पक्ष म्हणून प्रामाणिकपणे काम करण्यास सुरुवात करायला हरकत नाही.’
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times