अमरावती: विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत बहुतेक जागांवर सत्ताधाऱ्यांनी बाजी मारली असताना अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार अॅड. यांनी प्रस्थापितांना घाम फोडला आहे. सरनाईक हे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. त्यांनी आपले निकटचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. यांच्यावर निर्णायक आघाडी घेतली आहे.

वाचा:

अमरावतीमध्ये श्रीकांत देशपांडे हे शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाचे उमेदवार म्हणून लढत असतानाही सरनाईक यांनी मारलेली मुसंडी चकित करणारी ठरली आहे. हे सरनाईक आहेत कोण याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.

वाचा:

अॅड. किरण सरनाईक हे वाशिम जिल्ह्यातील आहे. अकोला-वाशिम हा संयुक्त जिल्हा असताना तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी विधान परिषदेच्या आमदार म्हणून निवड केलेल्या मालतीबाई सरनाईक यांचे ते पुत्र आहेत. अॅड. किरण सरनाईक हे अकोला जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले आहेत. वाशिममधील एका नावाजलेल्या शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष आहे. ते स्वतः शिक्षक आहेत. माजी मंत्री बाबासाहेब गोविंदराव सरनाईक यांच्या कुटुंबातील असलेले अॅड. सरनाईक हे सामाजिक, राजकीय व शिक्षण क्षेत्रात सक्रिय आहेत. मागील ५० वर्षांपासून त्यांचे कुटुंब काँग्रेससोबत जोडलेले आहे.

वाचा:

२२ व्या फेरीअखेर प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते

१. किरण सरनाईक – ८०८९
२. प्रा. श्रीकांत देशपांडे – ६४५२
३. शेखर भोयर – ५९२८
४. संगीता शिंदे – ३९६६
५. प्रा. अविनाश बोर्डे – ३६११

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here