मुंबई: ‘हिंमत असेल तर एकट्याने भाजपच्या विरोधात लढा’ असं आव्हान देणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी जोरदार टोला हाणला आहे. ‘चंद्रकांत पाटील यांचा विनोदी विधानं करण्याचा लौकिक आहे. त्यांना यावेळच्या परिस्थितीचा अंदाज होता, म्हणूनच त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांच्यासाठी सोयीचा मतदारसंघ स्वीकारला,’ असं पवार यांनी म्हटलं आहे.

वाचा:

पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर पवार पत्रकारांशी बोलत होते. चंद्रकांत पाटील यांनी निकालावर दिलेल्या प्रतिक्रियेबाबत पवारांनी भाष्य केलं. ‘विनोदी विधानं करण्याचा भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचा लौकिक आहे. ते मागच्या वेळी विधान परिषदेला कसे निवडून आले हे त्यांनाही माहीत आहे. आमच्या बाजूने एकापेक्षा अधिक उमेदवार असल्यामुळंच ते निवडून आले होते. यावेळची परिस्थिती वेगळी होती. त्यांना याचा अंदाज होता. म्हणूनच त्यांनी पुणे शहरातला त्यांच्या दृष्टीनं सोयीचा मतदारसंघ स्वीकारला. त्यांना विजयाचा विश्वास असता तर त्यांनी तसं केलं असतं. त्यामुळं त्यांनी एखादं वक्तव्य केलं असेल तर त्याची गांभीर्यानं नोंद घ्यायची गरज नाही,’ असं पवार म्हणाले. पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल म्हणजे महाआघाडीच्या कामावरचा लोकांचा विश्वास आहे. महाराष्ट्राचं चित्र बदलतंय याचं हे द्योतक आहे, असंही ते म्हणाले.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

‘पदवीधरमधील भाजपच्या पराभवाला तीन पक्षाची एकजूट कारणीभूत ठरली आहे. पुण्यात मतं खाणारा तिसरा ताकदीचा उमेदवार नव्हता. त्याचा फटका भाजपला फटका बसला. नागपुरातही फडणवीस यांच्या विरोधात सगळे एकत्र आले होते. भाजपचा उमेदवार निवडून आला तर आपलं काही खरं नाही हे महाविकास आघाडीला माहीत होतं म्हणून ते ताकदीनं लढले. हिंमत असेल तर त्यांनी एकेकट्यानं लढून दाखवावं. पण त्यांच्यात ती हिंमत नाही,’ असं पाटील यांनी म्हटलं होतं.

वाचा:

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here